Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश भारतातील 5 रहस्यमय मंदिर : ज्यातील घटना तुम्हालाही आश्चर्यचकित करतील

भारतातील 5 रहस्यमय मंदिर : ज्यातील घटना तुम्हालाही आश्चर्यचकित करतील

Subscribe

भारत एक असा देश आहे , ज्यात अनेक रहस्य आणि आकर्षणे आहेत. भारतातील मंदिरं, किल्ले, देवी-देवता यांबाबत अनेक कथा आणि रहस्य प्रचलित आहेत. भारतात अशीच काही अनोखी पौराणिक मंदिरं देखील आहेत. ज्याबाबत अनेक अनोख्या घटना सांगितल्या जातात. आज आम्ही तुम्हाला भारतातल्या त्या पाच रहस्यमय मंदिरांबाबत सांगणार आहोत जे खरंच अविश्वसनीय आहे.

भारतातील 5 रहस्यमय मंदिर

  • मेहंदीपुर बालाजी मंदिर

Mehandipur Balaji: मेहंदीपुर बालाजी से प्रसाद घर क्यों नहीं लाते? जानें  मंदिर से जुड़ी ये बातें - mehandipur balaji interesting facts mandir prasad  rules dausa mehandipur balaji temple ...

- Advertisement -

राजस्थानातील दौसाजिल्ह्यामध्ये मेहंदीपुर बालाजी मंदिर स्थित आहे. या मंदिरात हनुमानाची पूजा-आराधना केली जाते. हे मंदिर जवळपास 1 हजार वर्ष जुने आहे. या मंदिरात हनुमानाची बालस्परुप स्वयंभू मूर्ती आहे. अनेकांच्या मते, या मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला काही विचित्र गोष्टी दिसून येतील ज्यांना पहिल्यांदा पाहिल्यावर तुम्ही खाबरु शकता. असं म्हणतात की, या ठिकाणी वाईट शक्ती, भूत-प्रेत यांसारख्या नकारात्मक ऊर्जा दूर केल्या जातात.

  • वीरभद्र मंदिर

Dailyhunt

- Advertisement -

आंध्र प्रदेशातील लोपाक्षी जिल्ह्यामध्ये असलेल्या वीरभद्र मंदिराला देखील रहस्यमय मंदिर मानले जाते. या मंदिरामध्ये एकूण 70 खांब असून त्यातील एक खांब हवेत तरंगता आहे. याचे रहस्य आजही कोणी सांगू शकले नाही. असं म्हणतात की, या खांबाखालून आपल्याकडील एखादे वस्त्र काढल्याने घरात सुख-समृद्धी येते. शिवाय या मंदिरामध्ये मोठी पाऊलखुण देखील आहे, ज्याला अनेक लोक भगवान रामाच्या पाऊलखुणा मानतात.

  • कामाख्या मंदिर

कामाख्या देवी मंदिर के बारे में रोचक तथ्य और इतिहास – Kamakhya Devi Temple  In Hindi - Holidayrider.Com

गुवाहाटीतील नीलाचल टेकडीवर कामाख्या मंदिर स्थित आहे. हे मंदिर देवीच्या 51 शक्तीपीठांपैकी एक आहे. या मंदिरात देवीच्या मूर्तीची पूजा केली जात नाही तर देवीच्या योनीमार्गाची पूजा केली जाते. असं म्हणतात की, या ठिकाणी सती देवीचा योनी भाग पडला होता. त्यामुळे येथे महिन्यातील 3 दिवस देवीला मासिक पाळी येते. त्या काळात तिच्याजवळ एक पांढरा कपडा ठेवला जातो आणि मंदिर 3 दिवस बंद केले जाते. 3 दिवसानंतर ते पांढरे वस्त्र लाल रंगाने भिजलेले दिसते.

  • व्यंकटेश्वर मंदिर

तिरुपति वेंकटेश्वर मंदिर - divya himachal

 

आंध्रप्रदेशातील व्यंकटेश्वर मंदिरातील तिरुपती बालाजीची दिव्य मूर्ती स्वयंभू असल्याचे म्हटले जाते. तसेच या मूर्तीवर असलेले केस देखील खरे असल्याचे म्हटले जाते. स्थानिक लोकांच्या मते, या मूर्तीवर कान लावून ऐकल्याने समुद्राच्या लाटांचा आवाज येतो. कदाचित यामुळेच मंदिरात बसवलेली मूर्ती नेहमी ओलसर असते.

  • श्री स्तंभेश्वर महादेव मंदिर

this is the mysterious temple of lord shiva disappears in the sea after  seeing it pur – News18 हिंदी

गुजरातमधील श्री स्तंभेश्वर महादेव मंदिर भगवान शंकरांना समर्पित आहे. या मंदिराची रहस्यमय गोष्ट अशी की, हे मंदिर समुद्रावर वसलेले आहे. त्यामुळे जेव्हा पाण्याची पातळी वाढते तेव्हा हे मंदिर दिसत नाही, मात्र ज्यावेळी पाण्याची पातळी कमी होते त्यावेळी मंदिर पुन्हा दिसू लागते. असं दिवसातून सकाळी आणि संध्याकाळी होतं.

 


हेही वाचा :

Gudipadwa 2023 : जाणून घ्या गुढीपाडव्याबाबत प्रचलित समजुती आणि पौराणिक कथा

- Advertisment -