शाळेत दाखवलं बाबरी पतन; ५ जणांनवर गुन्हा दाखल

कर्नाटकातल्या एका शाळेने त्यांच्या वार्षिक क्रिडा दिवशी विद्यार्थ्यांकडून बाबरी मस्जिदच्या विध्वंसावर नाटक बसवले होते. सोशल मीडियाकडून प्रचंड टीका मिळाल्यानंतर ५ जणांवर या घटनेवर आधारित गुन्हा दाखल करण्यात आला.

शाळेत दाखवलं बाबरी पतन; ५ जणांनवर गुन्हा दाखल
शाळेत दाखवलं बाबरी पतन; ५ जणांनवर गुन्हा दाखल

 

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये कर्नाटकातील एका शाळेतील मुलांनी त्यांच्या वार्षिक क्रिडा दिवसासाठी बाबरी मस्जिदच्या विध्वंसावर नाटक बसवले होते. या व्हिडिओमध्ये बाबरी मस्जिदचे एक खूप मोठे पोस्टर दिसत आहे. भगवे झेंडे फडकवत आणि भगवे कपडे घालून विद्यार्थी पळत आणि नारे लावत या मस्जिदच्या पोस्टरचे विध्वंस करतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर एका आगीसारखा पसरला आणि सगळ्यांनीच या व्हिडिओवर प्रचंड टीका केली आहे. रविवारी झालेल्या या कार्यक्रमात पुडुचेरीचे उपराज्यपाल किरण बेदी आणि केंद्रीय रसायन आणि खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा हे उपस्थित होते.

तर आरएसएसचे नेते कल्लाडका प्रभाकर भट आणि श्री रामा विद्या केंद्र चालवणाऱ्या इतर चार जणांवर याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसीच्या कलम २५ (ए) आणि कलम २९८ (धार्मिक भावना दुखावणे) या कलमांनांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शाळेच्यात परिसरात राहणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे नेते अबोबॅकर सिद्दीकी यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या गोष्टीची दखल घेतली. कारवाई चालू असल्यामुळे कोणलाही अद्याप तरी अटक करण्यात आलेली नाही अशी माहिती पोलिसांनी दिली. कार्यक्रमाच्या ३० सेकंदांच्या व्हिडिओच्या आधारे तक्रार करण्यात आली आहे.

काय होत या कार्यक्रमात? 

‘हनुमान सारख्या ताकदिने कर सेवकांनी त्यांच्याकडे असलेल्या उपक्रमांनी बाबरी मस्जिदचा नाश केला’ असे कार्यक्रमाच्या दरम्यान भाष्यकार म्हणत होता. तर त्यानंतर ‘बोलो श्री रामचंद्र की जय.’ ‘बोलो भारत माता की जय,’ जय हनुमान’ असे नारे देखील लावण्यात आले.विद्यार्थी उडी मारताना आणि भगवा झंडा फडकवताना दिसत आहे. पोस्टरचेनंतर तुकडे केले जातात.

सोशल मीडियाच्या आक्रोशानंतर भट यांनी कार्यक्रमाची बाजू घेत म्हणाले की इतिहासातील भागांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा आणि देशभक्तीची भावना पसरविण्याचा हा एक प्रयत्न होता. सुप्रिम कोर्टाच्या अहवालानंतर विद्यार्थ्यांनी आयोध्येच्या घटनाचा विषय निवडला.


हेही वाचा: रतन टाटांना धक्का; सायरस मिस्त्रि हेच टाटा सन्सचे अध्यक्ष