घरCORONA UPDATEदेशात 24 तासांत 5 हजार 76 नवे रुग्ण, तर मृत्यूच्या संख्येत घट

देशात 24 तासांत 5 हजार 76 नवे रुग्ण, तर मृत्यूच्या संख्येत घट

Subscribe

देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. रुग्णांच्या संख्येत घट होत असतानाच मृत्यूच्याही संख्येत घट होत आहे. देशात मागील 24 तासांत 5 हजार 76 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 47 हजार 945 इतकी झाली आहे. तर काल शनिवारी दिवसभरात देशात 11 कोरोना बाधितांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.

कोरोनाबाधितांमध्ये 478 रुग्णांची घट झाली आहे. कोरोना महामारी सुरु झाल्यानंतर आतापर्यंत 5 लाख 28 हजार 150 रुग्णांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण 0.11 टक्के तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.71 टक्के आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील स्थिती काय?

- Advertisement -

राज्यात आजपर्यंत 79,55,268 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.9 टक्के झाले आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज 1,216 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. काल शनिवारी महाराष्ट्रात 734 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे.

 मुंबईत 1,900 नवीन रुग्ण

मुंबईत गेल्या 24 तासांत 209 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या मुंबईत 1,900 इतके नवीन रुग्ण आहेत. तर मुंबईचा रिकव्हरी रेट 98.1 टक्के इतका आहे. परंतु मागील 24 तासांत एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही.


हेही वाचा : मुख्यमंत्र्यांनी सरन्यायाधीशांसोबत एका व्यासपीठावर बसणे संकेतांना धरून नाही, जयंत पाटलांची


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -