घरताज्या घडामोडीधक्कादायक: पाच वर्षांच्या चिमुरडीवर शेजाऱ्याने केला बलात्कार

धक्कादायक: पाच वर्षांच्या चिमुरडीवर शेजाऱ्याने केला बलात्कार

Subscribe

नराधमाने मोबाइलवरील गेम खेळण्याच्या बहाण्याने पीडित चिमुरडीला त्याच्या घरी नेऊन तिच्या बलात्कार केला.

शनिवारी नवी दिल्लीतील चाणक्यपुरी भागात पाच वर्षांच्या चिमुरडीवर शेजाराने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. हा नराधम २५ वर्षांचा असून तो एक वाहन चालक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसंच त्याला पोलिसांनी अटक देखील केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित चिमुरडी आणि आरोपी दूतावास क्वार्टरमध्ये राहत होते. मुलीचे वडील हे हाऊस किपींग स्टाफमधील कर्माचारी आहेत. या घटनेच्या वेळी पीडितेचे वडील काम करत होते. तसंच या क्वार्टरमध्ये आरोपी आई-वडिलांसोबत राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, पीडित मुलगी नेहमी आरोपीच्या घरी येजा करत असे. घटनेच्या दिवशी ती तिच्या घराबाहेर खेळत होती. त्यावेळेस आरोपीने मोबाइलवरील गेम खेळण्याच्या बहाण्याने तिला आपल्या घरी घेऊन गेला. यादरम्यान आरोपीच्या घरात त्याचे आई-वडील नसल्यामुळे त्याने मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर जेव्हा मुलगी घरी परतली तेव्हा तिने आपल्या आईला खासगी भागात वेदना होत असल्याचे सांगितले. पीडितेच्या आईने तिला विचारल्यानंतर तिने सर्व काही सांगितले. यानंतर पीडित चिमुरडीच्या आईने तिला पोलिसांकडे नेले.

- Advertisement -

पोलिसांनी पीडित चिमुरडीला वैद्यकीय तपासणीसाठी नेलं असता डॉक्टरांनी तिच्यावर बलात्कार झाल्याचं सांगितलं. पोलिसांनी आरोपी विरोधात भारतीय दंड संहिता आणि पोक्सो कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


हेही वाचा – औरंगाबादमधील मृत्यूशी झुंजणाऱ्या महिलेचा मृत्यू!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -