50% Commission Letter : मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) 50 टक्के कमिशन पत्रावरून (50% Commission Letter) राजकारण चांगलेच तापले आहे. कर्नाटकच्या (Karnatak) 40 टक्क्यांच्या धर्तीवर राज्यात 50 टक्के कमिशनचा मुद्दा बनवण्याच्या रणनीतीने भाजपा (BJP) पुढे जात आहे, असा आरोप काँग्रेसने (Congress) केला आहे. त्यामुळे भाजपाने तीव्र विरोध दर्शवताना राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एफआयआर दाखल केल्या आहेत. भोपाळ, इंदूर, ग्वाल्हेरसह 41 जिल्ह्यांमध्ये प्रियंका गांधींसह (Priyanka Gandhi) कमलनाथ (Kamalnath), अरुण यादव (Arun Yadav) आणि ज्ञानेंद्र अवस्थी (Gyanendra Awasthi) यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. (50% Commission Letter BJP has filed a case against three people including Priyanka Gandhi in 41 districts)
हेही वाचा – Kerala : शालेय अभ्यासक्रमात गांधी हत्या आणि गुजरात दंगलींसारखे विषय पुन्हा जोडले
राज्यात तीन महिन्यांनी विधानसभा निवडणुका होणार आहेत. परंतु त्याआधी काँग्रेसने ‘कर्नाटक योजने’वरून राज्यातील भाजपा सरकारवर आरोप केले आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी, काँग्रेस मीडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश, माजी मुख्यमंत्री कमलनाथ, माजी पीसीसी प्रमुख अरुण यादव यांच्यासह अनेक नेत्यांनी भाजपावर 50 टक्के कमिशन घेण्याचा आरोप केला आहे. काँग्रेस नेत्यांनी लघु व मध्यम कंत्राटदार संघटनेच्या कमिशन पत्राचा संदर्भ दिला आहे. हे पत्र सर्वप्रथम काँग्रेस नेते अरुण यादव यांनी शेअर केले होते. राज्यात 50 टक्के कमिशन दिल्यानंतरच पैसे मिळत असल्याचा आरोप युनियनचे अध्यक्ष ज्ञानेंद्र अवस्थी यांनी पत्रात केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमार्फत चौकशी करून आमची प्रलंबित देयके देण्यात यावीत, अशी मागणी त्यांनी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे केली आहे. याशिवाय काँग्रेस नेत्यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये भाजपाविरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी अर्ज केला आहे.
मध्य प्रदेश में ठेकेदारों के संघ ने हाईकोर्ट के मुख्य न्यायाधीश को पत्र लिखकर शिकायत की है कि प्रदेश में 50% कमीशन देने पर ही भुगतान मिलता है।
कर्नाटक में भ्रष्ट BJP सरकार 40% कमीशन की वसूली करती थी। मध्य प्रदेश में BJP भ्रष्टाचार का अपना ही रिकॉर्ड तोड़कर आगे निकल गई है।… pic.twitter.com/LVemnZQ9b6
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) August 11, 2023
काँग्रेसच्या आरोपानंतर भाजपा नेत्यांनी ग्वाल्हेरमध्ये ज्ञानेंद्र अवस्थी यांच्याविरोधात पहिली एफआयआर दाखल केली आहे. यानंतर इंदूरमधील एफआयआरमध्ये प्रियांका गांधी, कमलनाथ आणि अरुण यादव यांची नावे जोडण्यात आली आहेत. याशिवाय भोपाळमध्येही ट्वीट करणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. पत्रात दिलेल्या पत्त्यावर पोलिसांना ज्ञानेंद्र नावाची कोणतीही व्यक्ती किंवा संस्था सापडलेली नाही. त्यामुळे पोलिसांना पत्ता अज्ञात असा लिहिला आहे. तसेच फसवणूक आणि बनावट कागदपत्रांसह प्रतिमा मलिन करण्याच्या कलमांखाली एफआयआर दाखल रण्यात आली आहे.
सर से पांव तक घोटालों से घिरी शिवराज सिंह चौहान सरकार के इशारे पर कांग्रेस की सम्मानित नेता श्रीमती प्रियंका गांधी, श्री जयराम रमेश और मुझ सहित कई नेताओं पर प्रदेश के विभिन्न जिलों में भाजपा नेताओं ने एफआईआर दर्ज कराई गई। जिस सरकार को मध्यप्रदेश का बच्चा-बच्चा कमीशन राज सरकार…
— Kamal Nath (@OfficeOfKNath) August 13, 2023
50 टक्के कमिशनचा नियम उखडून टाकण्याचे आवाहन
भाजपाकडून एफआयआर दाखल केल्यानंतर माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज्यातील शिवराज सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कमलनाथ यांनी ट्वीट करताना म्हटले की, डोक्यापासून पायापर्यंत घोटाळ्यांनी घेरलेल्या शिवराज सिंह चौहान सरकारच्या आदेशानुसार राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये भाजपा नेत्यांनी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, जयराम रमेश आणि माझ्याविरुद्ध एफआयआर दाखल केले आहेत. ज्या सरकारला मध्य प्रदेशचा कमिशन राज सरकार म्हणतात, ते सरकार भ्रष्टाचाराची चौकशी करू शकत नाही. पण भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करणाऱ्यांचा छळ करू शकते, असा आरोप करताना त्यांनी आवाहन केले की, मी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला भ्रष्टाचाराच्या विरोधात उभे राहा आणि 50 टक्के कमिशनचा नियम उखडून टाका.
हेही वाचा – NIA Raids : महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये पीएफआयच्या छुप्या ठिकाणांवर एनआयएची छापेमारी
काँग्रेसकडून भाजपा सरकारचा निषेध
काँग्रेस नेते प्रियांका गांधी, कमलनाथ आणि अरुण यादव यांच्याविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी रस्त्यावर उतरून भाजप सरकारचा निषेध केला. राज्य सरकारचे 50 टक्के कमिशन घेऊन त्यांनी सरकारची कोंडी केली. भोपाळ शहर जिल्हाध्यक्ष मोनू सक्सेना म्हणाले की, भाजप सरकारच्या दबावाखाली आमच्या नेत्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आता जनताच त्यांना उत्तर देईल, आम्ही घाबरणार नाही, आम्ही लढू, असे ते म्हणाले.