Blast in Afghanistan: अफगाणिस्तानच्या मशिदमध्ये भीषण स्फोट, आतापर्यंत ५० जणांचा मृत्यू

50 dead in Afghanistan's Kunduz mosque blast
Blast in Afghanistan: अफगाणिस्तानच्या मशिदमध्ये भीषण स्फोट, आतापर्यंत ५० जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानच्या कुंदूजमध्ये शुक्रवारी नमाजा दरम्यान जोरदार स्फोट झाला. यामध्ये ५० लोकांच्या मृत्यू झाला असून ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत. हा स्फोट हजारा शिया मशिदीला निशाणा बनवून केला गेला. या हल्ल्याची जबाबदारी आतापर्यंत कोणत्याही संघटनेने घेतली नाही आहे.

रशिया टुडेने सांगितले की, हा स्फोट अफगाणिस्तानच्या उत्तरेस कुंदुज प्रातांमधील सय्यद अबाद मशिदमध्ये झाला. कारण स्थानिक लोकं शुक्रवारी नमाज पठणासाठी मशिदीमध्ये सामिल झाले होते. आतापर्यंत कोणत्याही संघटनेने स्फोटाची जबाबदारी घेतली नाही आहे. या स्फोटाबाबत माहिती देताना तालिबानेचे प्रवक्ते म्हणाले की, आज दुपारी राजधानी कुंदुजच्या बांद खान अबाद जिल्ह्यातील शिया हमवतनच्या एका मशिदमध्ये एक स्फोट झाला आहे. ज्यामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत.

ऑगस्टच्या मध्यावर तालिबानद्वारे अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर आयएसआयएल संबंधित दहशतवादी हल्ले वाढले आहेत. दहशतवादी हल्ल्यात वाढ झाल्याने दोन्ही गटांमधील संघर्षाची शक्यता वाढवली जाऊ शकते. यापूर्वी रविवारी काबुलच्या एका मशिदीमध्ये स्फोटात १२ लोकांचा मृत्यू झाला होता आणि ३२ जण जखमी झाले होते. घटना काबुलच्या ईदगाह मशिदमधील गर्दीच्या जागी झाली होती.

तालिबानचे राज्य आल्यापासून अफगाणिस्तानमधील परिस्थिती बिकट झाली आहे. तालिबानला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. कारण इतर देशातून येणारे निधी बंद करण्यात आला आहे. तसेच यामुळे अफगाणिस्तानमधील काही लोकांचा भूकबळी होत आहे.


हेही वाचा – Afghanistan: अजब न्याय! पाव चोरल्याबद्दल दोन मुलांविरोधात तालिबानी खटला दाखल करणार