Wednesday, August 4, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश Iraq fire: इराकच्या रूग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये भीषण अग्नितांडव; ५० हून अधिक दगावल्याची...

Iraq fire: इराकच्या रूग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये भीषण अग्नितांडव; ५० हून अधिक दगावल्याची शक्यता

Related Story

- Advertisement -

इराकच्या दक्षिणेकडील शहर नासिरियातील एका रुग्णालयाच्या कोरोना वॉर्डात भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. या भीषण अग्नितांडवमध्ये कमीतकमी ५० लोक जिवंत दगावले गेले असून ६७ हून अधिक जखमी झाले आहेत. आगीवर आता नियंत्रण मिळवण्यात आले असून मदतकार्य सुरू केले आहे. बचाव करणारे कर्मचारी रुग्णालयात वाचलेल्यांचा शोध सुरू असून असे सांगितले जात आहे. तर मृतांची संख्या लक्षणीय वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १६ लोकांना रुग्णालयातून बाहेर काढण्यात यश आले आहे. स्थानिक आरोग्य अधिकारी हैदर अल जमिली यांनी सांगितले की, कोरोना वॉर्डमध्ये आग लागली असून बरेच लोक जळून खाक झाले आहेत आणि मृतदेह ओळखणे कठीण आहे. तसेच, अद्याप बरेच लोक इमारतीत अडकले असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र आगीचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.

बघा व्हिडिओ

- Advertisement -

एका आरोग्य अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्सिजन टाकीच्या आत झालेल्या स्फोटामुळे ही भीषण आग लागली. मात्र नंतरच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी. एका आरोग्य कर्मचाऱ्याने सांगितले की, या आगीमुळे कोरोनाव्हायरस वॉर्डात अनेक रुग्ण अडकले. बचाव करणाऱ्या बऱ्याच कर्मचाऱ्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. या घटनेच्या व्हिडीओमध्ये असे दिसते आहे की रुग्णालयातून धूराचे लोट बाहेर येत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-कादिमी यांनी मंत्र्यांची तातडीची बैठक बोलविली आहे. अनेक जळलेले मृतदेह हॉस्पिटलमधून काढण्यात आले. या घटनेबद्दल इराकी संसदेच्या सभापतींनी सरकारवर टीका करण्यात येत आहे.


हिमाचलमध्ये ढगफुटी, नद्यांना पूर

- Advertisement -