घरताज्या घडामोडीCorona Vaccine: लस निर्मितीतील कंपनीचे ५० कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात; व्यवस्थापनानेच दिली माहिती

Corona Vaccine: लस निर्मितीतील कंपनीचे ५० कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात; व्यवस्थापनानेच दिली माहिती

Subscribe

कोरोनाच्या लढाईत लस महत्त्वाचे अस्त्र आहे. देशात सध्या दोन लसी कोरोनाच्या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. येणाऱ्या काळात देशात आणखीन कोरोना लसीची भर पडेल. पण सध्या भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड या दोन लसीचे डोस दिले जात आहेत. मात्र यापैकी एक लस तयार करणारी कंपनी कोरोनाच्या विळख्यात अडकल्याचे समोर आले आहे. ही कंपनी दुसरी तिसरी कोणती नसून हैदराबाद स्थित भारत बायोटेक आहे. भारत बायोटेकच्या सहव्यस्थापकीय संचालक सुचित्रा ईला यांनी याबाबत ट्वीटवर माहिती दिली आहे. सध्या त्याच्या ट्वीटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. सुचित्रा ईला यांनी अलीकडे आपले ५० कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याची माहिती दिली. यावरून काही लोकं त्यांच्यावर टीका करत आहेत, तर काही लोकं त्यांचे कौतुक करताना दिसत आहे. अनेक लोकांचे म्हणणे आहे की, कोव्हॅक्सिन लोकांचे आयुष्य वाचवत आहे. तर अनेकांनी सवाल केला आहे की, कर्मचाऱ्यांचे लसीकरण का केले नाही?

यामुळे सुचित्रा ईला यांनी केले ट्वीट…

कोरोनाची लस कोव्हॅक्सीनच्या पुरवठ्यात अडथळा येण्यावर काही नेत्यांनी टीका केली होती. त्यामुळे सुचित्रा ईला यांनी बुधवारी ट्वीट केले होते आणि सांगितले की, काही राज्य आमच्या हेतूवर शंका घेत आहेत, हे ऐकूण टीमला फारच वाईट वाटले. कोरोनामुळे ५० कर्मचारी काम करत नाही आहेत. तरी आम्ही कोरोना महामारीला रोखण्यासाठी लॉकडाऊनमध्येही तुमच्यासाठी चौवीस तास काम करत आहोत.

- Advertisement -

यावेळेस ईला यांनी १८ राज्यांमध्ये कोव्हॅक्सिन पुरवत असल्याचे सांगितले. यामध्ये आंध्र प्रदेश, हरयाणा, ओडिसा, आसाम, जम्मू काश्मीर, तामिळनाडू, बिहार, झारखंड, त्रिपुरा, छत्तीसगढ, कर्नाटक, तेलंगणा, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या १८ राज्यांचा समावेश असून येथे कोव्हॅक्सिनचा पुरवठा केला जात आहे.

- Advertisement -

ईला यांच्या ट्वीट उपस्थितीत केले प्रश्न

सुमित्रा ईला यांच्या ट्वीटवर एका युझर अशी प्रतिक्रिया दिली की, ‘तुमच्या ५० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण कशी झाली? त्यांना लस का दिली नाही? शिवाय तात्पुरत्या स्वरुपात लोकांची भरती का नाही केली?’ तर दुसऱ्या युझरने लिहिले की, ‘तुमचे आभार मानू इच्छितो. माझे आजी-आजोबा ७५ वर्षांचे आहे आणि त्यांना पाच आठवड्यापूर्वी लस दिली, दोन आठवड्यांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना फक्त सौम्य ताप होता. आता ते कोरोनामुक्त झाले असून ते ठीक आहेत आणि त्यांना कोणतीच समस्या नाही आहे.’


हेही वाचा – कोरोना झाल्यानंतर शरीरात किती दिवस अँटीबॉडीज राहतात?; वैज्ञानिकांनी केला खुलासा


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -