घरदेश-विदेशदोन गावातील 50 मुस्लिमांना केले बहिष्कृत? मौलानाने काढला फतवा

दोन गावातील 50 मुस्लिमांना केले बहिष्कृत? मौलानाने काढला फतवा

Subscribe

नवी दिल्ली : सध्या रमजान महिना (ramazan month) सुरू आहे. या पवित्र महिन्यात उत्तर प्रदेशातील सोनभद्रमधून (Sonbhadra) एक वाईट बातमी समोर येत आहे. मौलानाने फतवा काढत सोनभद्रमधील दोन गावांतून 10 कुटुंबांना बहिष्कृत केले आहे (10 families have been evicted from two villages). या फतव्यामुळे मुस्लिम समाजातील लोक या 10 कुटुंबांसोबत सलाम पूजा करणार नाही आहेत.

हे प्रकरण सोनभद्रच्या कोन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खारोंधी आणि कुडवा गावांशी संबंधित आहे. 10 कुटुंबांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये 50 जणांना समाजातील कोणत्याही प्रकारच्या खाण्यापिण्याची परवानगी नाही, विवाह संबंधांमध्ये सहभागी होता येणार नाही आणि याच्यासोबत संबंध ठेवणाऱ्यांनाही समाजातून बहिष्कृत करण्यात येईल, असा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

- Advertisement -

समाजातून बहिष्कृत केलेले लोक पीर सय्यद फैज हसन सफवी यांच्या अला हजरतचे पालन करत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे दारुल उलूम कादरिया मदरसा बागडूचे प्राचार्य आणि उपप्राचार्य यांनी सोनभद्रमधील कोन पोलीस स्टेशन क्षेत्रातील खारोंधी आणि कुडवा गावातील 10 कुटुंबांना मुस्लिम समाजातील पीर सय्यद फैज हसन सफवी यांच्या लोकांना बहिष्कृत करण्याचा फतवा जारी केला आहे. या दोन्ही गावांमधील प्रत्येकी पाच कुटुंबांना समाजातून बहिष्कृत करण्यात आले आहे. त्यामुळे जवळपास 50 लोकांना कोणत्याही कार्यक्रमात सामील करण्यात आले नव्हते. ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या फतव्याला बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांनी जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे न्यायाची मागणी केली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती म्हणत आहे की, पीर सय्यद फैज हसन सफावी यांना मानणाऱ्या 10 जणांवर समाजातून बहिष्कार टाकण्यात आला आहे. त्यांच्याशी कोणाचे काही संबंध असतील तर त्याच्यावरही बहिष्कृत करण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी पीडित कुटुंबातील लोकांनी पोलिसांकडे मौलाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर फतवा काढणाऱ्या दोन्ही धर्मगुरूंना पोलिसांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करून प्रकरण लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -