Maharashtra Assembly Election 2024
घरक्राइमPakistan Terrorist Attack : प्रवासी वाहनांवर दहशतवादी हल्ला; 50 लोकांचा मृत्यू

Pakistan Terrorist Attack : प्रवासी वाहनांवर दहशतवादी हल्ला; 50 लोकांचा मृत्यू

Subscribe

पाकिस्तानातील संवेदनशील क्षेत्र असलेल्या खैबर पख्तुनख्वा येथे झालेल्या दहशतवादी हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली : कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला पाकिस्तान सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. तर दुसरीकडे आर्थिक संकट आणि महागाईमुळे सर्वसामान्य पाकिस्तानी जनतेचे जगणेही कठीण झाले आहे. असे असतानाच पाकिस्तानातील संवेदनशील क्षेत्र असलेल्या खैबर पख्तुनख्वा येथे झालेल्या दहशतवादी हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. (50 people killed in terrorist attack on passenger vehicles in Pakistan Kurram district)

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या काही माध्यमांनी खैबर पख्तुनख्वामधील कुर्रम जिल्ह्यातील ओचट भागात प्रवासी वाहनांवर हल्ला केल्याचे वृत्त दिले आहे. ज्या गाड्यांवर हल्ला झाला त्या एकाच ताफ्यातील होत्या. या गाड्या पाराचिनारहून पेशावरला जात होत्या. या दहशतवादी हल्ल्यात 50 जणांचा मृत्यू झाला असून सध्या 20 जण जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. तसेच या हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी कुर्रममधील या दहशतवादी घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला असून मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, निर्दोष प्रवाशांवर हल्ला करणे हे एक भ्याड आणि अमानवी कृत्य आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Pakistan News : ऐकावे ते नवलंच! हजारो लोकांना मेजवानी देण्यासाठी भिकाऱ्याने खर्च केले 1.25 कोटी

- Advertisement -

एका पाकिस्तानी वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानच्या कुर्रम जिल्ह्यात मागील अनेक महिन्यांपासून विविध जमाती आणि गटांमध्ये संघर्ष सुरू आहे. या संघर्षात यापूर्वीही अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. हिंसाचारामुळे या भागातील मुख्य आणि जोडणारे रस्ते, तसेच अफगाणिस्तानची सीमा पुन्हा पुन्हा बंद केली जात आहे. त्यामुळे स्थानिकांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

हल्ला झालेल्या भागात तालिबानचे वर्चस्व

दरम्यान, एका स्थानिक पत्रकाराने वृत्तसंस्थेशी संवाद साधताना सांगितले की, ज्या भागात हा हल्ला झाला तेथे तालिबानचे वर्चस्व आहे. खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन खान गंडापूर यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. तर प्रांताचे कायदा मंत्री, क्षेत्रीय खासदार आणि मुख्य सचिव यांच्या शिष्टमंडळाला परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि अहवाल सादर करण्यासाठी तत्काळ कुर्रमला भेट देण्याचे निर्देश दिले. याशिवाय प्रांतातील सर्व रस्त्यांवर सुरक्षा वाढविण्यासाठी प्रांतीय महामार्ग पोलीस युनिट तयार करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

हेही वाचा – Crime : गॅस कटरने खिडकी कापली, बँकेत प्रवेश केला अन् चोरट्यांचा जवळपास 14 कोटींच्या सोन्यावर डल्ला


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -