घरताज्या घडामोडीCoronavirus: ५० टक्के भारतीय घालतं नाहीत मास्क, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून चिंता व्यक्त

Coronavirus: ५० टक्के भारतीय घालतं नाहीत मास्क, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून चिंता व्यक्त

Subscribe

देशात कोरोना दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. जरी नव्या कोरोनाबाधितांची संख्येत घट होताना दिसत असली तरी मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे. देशात आतापर्यंत २ कोटी ५७ लाखांहून अधिक कोरोनाबाधित आढळले असून यापैकी २ लाख ८७ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ कोटी २३ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ३२ लाख ३३ हजारांहून अधिक जणांवर अद्याप उपचार सुरू आहे. दरम्यान आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या परिषदेद्वारे एक चिंता व्यक्त करण्यात आली ती म्हणजे भारतात ५० टक्के लोकं मास्क घालत नाही आहेत. फक्त ७ टक्के लोकं व्यवस्थितरित्या मास्क घालत आहेत. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने २५ शहरांमध्ये अभ्यास केला आहे.

- Advertisement -

केलेल्या अभ्यासातून असे समोर आले की, ६४ टक्के लोकं तोंड झाकून घेतात पण नाक नाही. २० टक्के लोकांचा मास्क अनुवटीवर असतो. तर २ टक्के लोकांचा मास्क मानेवर असतो आणि १४ टक्के लोकं व्यवस्थित मास्क घालत आहेत. त्याचा मास्क नाका, तोंडावर असून त्याच्या मास्कला नाकावरचा क्लिप आहे.

दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात २४ तासांत ५० टक्के लोकांचा मृत्यू ५ राज्यामध्ये झालेला आहे. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि दिल्लीचा समावेश आहे.

- Advertisement -

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात २४ तासांत २ लाख ७६ हजारांहून अधिक नवे कोरोना रूग्ण आढळले असून एका दिवसात ३ हजार ८७४ जणांच्या मृत्यूची विक्रमी नोंद झाली आहे. तर ३ लाख ६९ हजार ०७७ जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.


हेही वाचा – Black Fungus नंतर आता जास्त धोकादायक White Fungus; जाणून घ्या या आजाराबाबत


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -