घरCORONA UPDATELockdown - दारूच्या अट्टाहासापायी त्याने गमावला जीव!

Lockdown – दारूच्या अट्टाहासापायी त्याने गमावला जीव!

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. केवळ जीवनावश्यक वस्तूंची खरेदी विक्री केवळ सध्या देशात सुरू आहे. जीवनावश्यक वस्तूंमध्ये दारू येत नसल्यामुळे देशभरात दारूची दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे दारू मिळत नसल्यामुळे तळीरामांची मोठी पंचयत झाली आहे. दारू पिण्यासाठी वेगवेगळे पर्याय हे तळीराम शोधताना दिसत आहेत. एका तळीरामानं चक्क दारूची बाटली संमजून थेट अ‍ॅसिडची बाटलीच तोंडाला लावली. यात त्याचा मृत्यू झाला.

भोपाळमधील एका गावात राहणाऱ्या ५० वर्षीय एका व्यक्तीला सोमवारी रात्री बिअर पिण्याची इच्छा झाली. त्याचवेळी घरात ठेवण्यात आलेल्या एका बिअरच्या बाटलीवर त्यांची नजर पडली. त्या बाटलीत बिअरचं आहे असा त्याचा समज झाला आणि कोणाच्याही नकळत त्यांनी ती पिऊन टाकली.

- Advertisement -

परंतु आपण प्यायलेल्या बाटलीत अ‍ॅसिड असल्याचं समजताच त्यांनी लगेचच ही माहिती आपल्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं. स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना नजीकच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. परंतु उपचारादरम्यान मंगळवारी त्यांच्या मृत्यू झाला.


हे ही वाचा – दारू न मिळाल्याने ५ मित्रांनी प्यायले ‘मिथेनॉल’; दोघांचा गेला जीव

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -