दिल्लीपाठोपाठ पंजाबमध्ये आपचा धडाका, ५१ लाख कुटुंबांना मिळणार मोफत वीज

panjab cm

पंजाबचे आपच्या भगवंत मान यांच्या सरकारने सत्ता आल्या एका महिन्यात मोफत वीज जुलैपासून देणार असल्याची घोषणा केली होती. यानंतर पंजाबमध्ये 300 युनिट वीज मोफत देण्यात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1 जुलै पासून करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली आहे. याबाबत भगवंत मान यांनी ट्विट केले आहे. यात ट्विटमध्ये त्यांनी पंजाब सरकारच्या मोफत वीज योजनेचा फायदा राज्यातील ५१ लाख कुटुंबाना होणार असल्याचे सांगितले.

भगवंत मान ट्विटमध्ये काय म्हणाले –
मी पंजाबी लोकांसोबत वीज हमीशी संबंधित एक चांगली बातमी शेअर करत आहे. मोफत वीज देण्याचे वचन 1 जुलैपासून लागू करण्यात आले आहे. जुलै-ऑगस्टचे बिल सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात येईल. सुमारे 51 लाख घरांचे वीज बिल शून्यावर येईल. आम्ही सांगतो तेच करतो…, असे ट्विट भगवंत मान यांनी केले आहे.

अरविंद केजरीवाल यांनी दिले होते आश्वासन –

आम आदमी पक्षाने तीनशे युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचे आश्वासन निवडणुकीत दिले होते. प्रचारातील हे प्रमुख आश्वासन होते. थकीत वीजबिले माफ केली जातील, आणि राज्यात २४ तास वीजपुरवठा केला जाईल, असेही आश्वासन आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक प्रचारात दिले होते.