घरताज्या घडामोडीशौचालयातील CCTV मध्ये शिक्षकांचे व्हिडिओ काढले; फुकट काम करण्यासाठी टाकला दबाव!

शौचालयातील CCTV मध्ये शिक्षकांचे व्हिडिओ काढले; फुकट काम करण्यासाठी टाकला दबाव!

Subscribe

एका खासगी शाळेच्या शौचालयात ऑपरेटरने सीसीटीव्ही लावून शिक्षकांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओच्या मदतीने शिक्षकांना पगाराविना काम करण्यासाठी ब्लॅकमेल केले जात होते. ही घटना उत्तर प्रदेशमधील मेरठ जिल्ह्यातील सदर पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. याप्रकरणी तब्बल ५२ शिक्षकांनी तक्रार दाखल केली.

दरम्यान शिक्षकांनी तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी बुधवारी शिक्षकांना धमकावण्यासाठी त्यांच्या घरी देखील पोहोचले होते. पण संध्याकाळी उशिरा पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली. गेल्या अनेक महिन्यांपासून शिक्षकांसोबत हा प्रकार सुरू होता. तक्रारीत शिक्षकांनी असा आरोप केला आहे की, ‘ज्यावेळेस पगारासाठी आवाज उठवला आणि प्रलंबित पगाराची मागणी केली. त्यावेळेस सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या आक्षेपार्ह व्हिडिओचे फुटेजची भीती दाखवून धमकी देत असतं.’

- Advertisement -

पीडित शिक्षकांनी शाळेच्या व्यवस्थापकीय समितीचे सचिव आणि त्यांच्या मुलाविरुद्ध लैंगिक छळाच्या आरोपाखाली बुधवारी तक्रार दाखल केली आहे. मेरठच्या सदर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ (a) (लैंगिक छळ), ३५४ (c) (व्हॉयॉरिझम) आणि ५०४ (हेतुपुरस्सर अपमान) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पीडित शिक्षकांनी केलेले आरोप मात्र सचिवाने फटाळले आहेत. याबाबत आरोपी सचिव म्हणाला की, ‘महिल्यांच्या शौचालयात सीसीटीव्ही नाहीत. पण ते पुरुषांच्या शौचालयामध्ये बसविण्यात आले आहेत. अलीकडे घडलेल्या शाळांमधील हत्येच्या पार्श्वभूमीवर ते बसवण्यात आले होते.’ याबाबत टाईम्स ऑफ इंडियाने माहिती दिली आहे. सचिवांनी मात्र हे कबूल केले की, ‘गेल्या काही महिन्यांपासून शाळा शिक्षकांना पगार देण्यास शाळा अपयशी ठरली आहे. त्यांनी या अपयशाचे श्रेय सध्या सुरू असलेल्या साथीच्या परिस्थितीला दिले.’

- Advertisement -

हेही वाचा – सगळं नॉर्मल झाल्यावर Work From Home चं काय होणार? बिल गेट्स म्हणतात…!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -