घरटेक-वेकरिलायन्सकडून भारतीयांना बंपर गिफ्ट, जिओ 5 जी इंटरनेट सेवा दिवाळीपासून सुरू होणार

रिलायन्सकडून भारतीयांना बंपर गिफ्ट, जिओ 5 जी इंटरनेट सेवा दिवाळीपासून सुरू होणार

Subscribe

मुंबई – भारतीय ग्राहकांना दिवाळीत बंपर गिफ्ट मिळणार आहे. कारण, रिलायन्स जिओ 5 जी इंटरनेट (Reliance Jio 5G Internet Service) सेवा दिवाळीपासून सुरू होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani Reliance Industry chairman) यांनी याबाबत आज घोषणा केली. देशातील सर्वांत स्वस्त 5 जी सुविधा पहिल्या टप्प्यात चार महानगरात सुरू होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रिजची आज सर्वसाधारण बैठक संपन्न झाली. या बैठकीत त्यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. तसंच, जिओ ही देशातील सर्वांत मोठी टेलिकॉम कंपनी असून याचे ४० कोटींहून अधिक युजर्स असल्याची माहिती अंबानी यांनी दिली.

मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकत्ता या चार मेट्रो शहरात सुरुवातीला 5 जी सेवा सुरू होणार आहे. त्यानंतर, डिसेंबर २०२३ पर्यंत देशातील प्रत्येक शहरात 5 जी इंटरनेट सेवा सुरू होईल. रिलायन्स जिओ 5 जी नेटवर्कसाठी दोन लाख कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असून यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. तसंच, यासाठी सर्व ग्लोबल स्मार्टफोन्ससाठी काम सुरू असल्याचीही माहिती मुकेश अंबांनी यांनी दिली.

- Advertisement -

5 जी बाबात महत्त्वाच्या घोषणा काय?

  • मेटा, गुगल, मायक्रोसॉफ्ट, एरिक्सन, नोकिया, सॅमसंग आणि सिस्कोसारख्या दिग्गज टेक कंपन्यांसाठी रिलायन्सने भागिदारी केली आहे.
  • देशातील सर्वांत स्वस्त 5 जी इंटरनेट सेवा जिओ देणार आहे. तसंच, १०० मिलिअन घरांना जोडण्यात येणार आहे.
  • 5 जी नेटवर्कसाठी स्टॅण्डअलोन तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. क्वॉलकॉम आणि इंटेलसोबत रिलायन्स भागीदारी करणार आहे. तर, स्वस्तात 5 जी मोबाईळ उपलब्ध करून देण्यासाठी गुगलसोबतही भागिदारी करणार आहे.
  • जिओने स्टॅण्डअलोन 5 जी ची घोषणा केली आहे. 5 जी साठी 4जी चे इंन्फ्रास्ट्रक्चर वापरण्यात येणार नाही. चांगल्या कव्हरेजसाठी सर्व २२ टेलिकॉम सर्कल्समध्ये प्रीमिअम ७०० मेगाहर्ट्ज बँडमध्ये 5 जी स्पेक्ट्रम विकत घेणारा रिलायन्स हा एकमेव ऑपरेटर आहे.

 

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -