घरताज्या घडामोडीजपानला ६.३ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का, बुलेट ट्रेन्स तातडीने बंद

जपानला ६.३ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का, बुलेट ट्रेन्स तातडीने बंद

Subscribe

जपानच्या पश्चिमेकडील इशिकावा प्रांतात ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे. त्यामुळे बुलेट ट्रेन्सही तातडीने बंद करण्यात आल्या. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत त्सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.

जपानच्या हवामान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार दुपारी २.४२ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या आता १० किमी खोलीवर होता. त्यामुळे लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या नागानो आणि कानाझावा दरम्यानची बुलेट ट्रेन सेवा निलंबित करण्यात आली आहे.

- Advertisement -

२८ मार्चला जपानच्या होक्काइडोमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार या भूकंपाची तीव्रता ६.२ रिश्टर स्केल इतकी होती. जपानमध्ये साधारणपणे वर्षभर भूकंप होत असतात. रिश्टर स्केलवर त्यांची तीव्रता जास्त असताना हे भूकंप प्राणघातक असले तरी. जपानमध्ये जेव्हा उच्च वेगाने भूकंप होतो, तेव्हा त्सुनामीचा सर्वाधिक धोका असतो.

- Advertisement -

हेही वाचा : Jammu Kashmir : आयईडी स्फोटात 2 जवानांना वीरमरण, चकमक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -