६ इमारती, २१ प्लॉट, लाखोंचे सोने-दागिने; तहसीलदाराची कोट्यवधींशी संपत्ती जप्त

भुवनेश्वर – गेल्या काही दिवसांपासून बेनामी मालमत्ताप्रकरणी छापेमारी सुरू आहे. भ्रष्टाचारप्रकरणी सुरू असलेल्या छापेमारीत अनेकांकडून कोट्यवधींची रक्कम जप्त केली आहे. त्यातच, आता एका तहसीलदाराच्या घरात तब्बल कोट्यवधीची संपत्ती सापडली आहे. ओडिसातील दक्षता विभागाने ही मोठी कारवाई कारवाई केली आहे. कोरोडो रुपयांच्या या संपत्तीवर टाच आणली आहे.

तहसीलदार कुलमणी पटेल यांच्या घरी छापेमारी केली असून यातून आतापर्यंत ६ इमारती, ४ दुकानं, २१ प्लॉट, २ ट्रॅक्टर आणि इतर ५ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. ४ डीएसपी, १० इन्स्पेक्टर, चार एएसाई आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या साथीने ही कारवाई केली.

सध्या जप्त करण्यात आलेल्या भूखंडाचं मोजमाप सुरू आहे. तसंच, भ्रष्टाचारविरोधी समितीने पटेल यांच्या १४.४८ लाख रुपये मुल्यांच्या ३ चाकी गाड्या, दोन ट्रॅक्टर आणि १४ लाख रुपयांच्या दोन ट्रेलरही जप्त केले आहे. तसंच,  छापेमारीदरम्यान अतिरिक्त तहसीलदारच्या ७.८१ लाख रुपये मुल्यांचं सोने आणि चांदींची दागिने आणि ३७.६८ लाख रुपयांचे सेव्हिंग्जही ताब्यात घेतले आहेत.