उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने उत्तर प्रदेशच्या वेगवेगळ्या भागातून ISIS च्या सहा संशयितांना अटक केली आहे. रकीब इनाम, नावेद सिद्दीकी, मोहम्मद नोमान आणि मोहम्मद नाझीम अशी या सहापैकी चौघांची नावे आहेत. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी अलिगड विद्यापीठाच्या स्टुडंट्स ऑफ अलिगढ युनिव्हर्सिटी (एसएएमयू) या विद्यार्थी संघटनेशी संबंधित आहेत आणि एसएएमयू बैठकीद्वारे एकमेकांशी जोडले गेले होते. वृत्तानुसार, उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी देशात मोठा दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखत होते. यूपी एटीएसने सहा जणांच्या अटकेने अलीगड विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेच्या दहशतवादी जाळ्याचा पर्दाफाश केला.
अलिगढ मुस्लीम विद्यापीठावर देखरेख
उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने दावा केला की SAMU बैठका ISIS च्या नवीन भरती सेल बनल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीगढ विद्यापीठाचा विद्यार्थीही केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर आहे. पुणे इस्लामिक स्टेट (आयएसआयएस) मॉड्यूल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केलेल्या रिझवान आणि शाहनवाज यांच्या चौकशीदरम्यान अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील अनेक विद्यार्थी देशविरोधी अजेंडा पसरवण्यात गुंतल्याचे उघड झाले. सोशल मीडिया आणि ISIS च्या संपूर्ण भारत नेटवर्कशी जोडलेले आहेत. रिझवान आणि शाहनवाज यांची चौकशी केल्यानंतर यूपी एटीएसने आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे.
विशेष डीजी प्रशांत कुमार म्हणाले की, आरोपी आयएसआयएस विचारसरणीने प्रेरित होते आणि राज्यात दहशतवादी कारवाया करण्यासाठी त्यांच्या आयएसआयएस मास्टर्सकडून सूचना घेत होते. “ते साहित्य गोळा करत होते आणि हल्ल्याची योजना आखत होते,” असं कुमार यावेळी म्हणाले.
दहशत पसरवण्याचे षडयंत्र रचले जातेय
एटीएसने या दोघांच्या पेन ड्राईव्हमधून आयएसआयएस आणि अल कायदा इन द इंडियन सबकॉन्टिनेंट (एक्यूआयएस) शी संबंधित प्रचार साहित्य जप्त केले. एटीएसने सांगितले की, 6 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आलेल्या अर्सलान आणि तारिक यांच्या चौकशीदरम्यान अटक केलेल्या चार जणांची नावे समोर आली आहेत. नंतर, 8 नोव्हेंबर रोजी, आणखी एक संशयित, वजिहुद्दीन (34), ज्याने AMU मधून लोक प्रशासनात पीएचडी देखील केली आहे, त्याला अटक केली. तपासाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत मॉड्यूलच्या सात जणांना एटीएसने अटक केली आहे.
असा खुलासा झाला
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने शाहनवाज आलम आणि रिजवान अश्रफ यांना अटक केल्यानंतर प्रथमच अर्सलान आणि तारिकची नावे समोर आली होती. अलिगड मुस्लीम विद्यापीठातील (एसएएमयू) विद्यार्थ्यांशी त्यांचा संबंध होता. “या विद्यार्थी संघटनेचे काही सदस्य आयएसआयएससाठी काम करतात,” असे एटीएसने म्हटले आहे. आलम आणि अश्रफ हे स्वत: कट्टरवादी होते आणि त्यांनी 2 ऑक्टोबरला अयोध्या, दिल्लीचे अक्षरधाम आणि मुंबईच्या चबड हाऊसवर हल्ल्याची योजना आखली होती. अश्रफ हा परदेशी-आधारित हँडलर आणि मॉड्यूलच्या उर्वरित सदस्यांशी संवाद साधत होता आणि त्याने ISIS मध्ये सामील होण्याचे वचन दिले होते. स्पेशल सेलने नंतर एटीएसला मॉड्यूलबद्दल माहिती दिली.
(हेही वाचा: उत्तरकाशीमध्ये निर्माणाधीन बोगदा कोसळला; आत अडकलेल्या 40 कामगारांना पाइपद्वारे ऑक्सिजन पुरवठा )