घरदेश-विदेशजम्मूच्या नरवालमध्ये लागोपाठ दोन भीषण स्फोट, 6 जण जखमी

जम्मूच्या नरवालमध्ये लागोपाठ दोन भीषण स्फोट, 6 जण जखमी

Subscribe

जम्मूमधील नरवाल परिसरात शनिवारी ( 21 जानेवारी) सकाळी लगोपाठ दोन भीषण स्फोट झाले, या स्फोटात 6 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जम्मूचे एडीजीपी मुकेश सिंह यांनी सांगितले की, जम्मूच्या नरवाल भागात झालेल्या दोन स्फोटात सह जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

घटनेतील जखमींना जीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नरवाल भागातील ट्रान्सपोर्ट नगरच्या सात आणि नऊ क्रमांकाच्या यार्डमध्ये हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस घटनास्थळी उभी असलेली सर्व वाहने हटवत आहेत. या घटनेनंतर परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.

- Advertisement -

प्रजासत्ताक दिन आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर आता जम्मू विभागात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येत आहे.

- Advertisement -

जखमींची नावं

सोहेल कुमार, (वय 35)
सुशील कुमार, (वय 26)
विशाप प्रताप, (वय 25)
विनोद कुमार, (वय 52)
अरुण कुमार, (वय 25)
अमित कुमार, (वय 40)
राजेश कुमार, (वय 35)


सीट बेल्ट न लावणं ब्रिटिश पंतप्रधान सुनक यांना पडलं महागात; ठोठावला इतका दंड

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -