घरदेश-विदेशनक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ६ जवान शहीद

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ६ जवान शहीद

Subscribe

झारखंडमधील गढवा जिल्ह्यातील छिंजो मंगळवारी संध्याकाळी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात ६ जवान शहीद झाले आहेत. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ही चकमक सुरू होती.

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ६ जवान शहीद झाले आहेत. झारखंडमधील गढवा जिल्ह्यातील छिंजो मंगळवारी संध्याकाळी नक्षलवाद्यांनी भूसुरूंग स्फोट घडवून आणला. त्यामध्ये सहा जवान शहीद झाले आहेत. गढवा जिल्ह्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ही माहीती दिली आहे. शिवाय काही जवान जखमी देखील झाले आहेत. लातेहार आणि गढवाच्या सीमेवरील छिंजो भागात नक्षलवाद्यांचा वावर असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर नक्षलवाद्यांकरता पोलीस आणि जवानांनी संयुक्तपणे शोध मोहिम राबवली होती. यावेळी छिंजो भागात नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. त्यानंतर भुसुरूंगाचा स्फोट घडवून आणला. यामध्ये झारखंड जगुआरचे सहा जवान शहीद झाले. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ही चकमक सुरू होती. पण, किती नक्षलवादी ठार करण्यात आली याची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही.

दहशतवाद्यांविरोधात शोध मोहिम

नक्षलवाद्यांची सुरक्षा दलांविरोधातील कारवाई दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलांमार्फत मोठ्या प्रमाणावर शोध मोहिम राबवण्यात येते.यापूर्वी देखील नक्षलवाद्यांनी भुसुरूंग स्फोट घडवून आणत सुरक्षा दलांना लक्ष केले आहे. पण, नक्षलवाद्यांच्या कारवायांना आम्ही भीक घालणार नाही अशी प्रतिक्रिया सुरक्षा दलांनी दिली आहे. वाढता नक्षलवाद रोखण्यासाठी सुरक्षा दलांनी उघडलेल्या कारवाईमध्ये नक्षलवाद्यांचा देखाील मोठ्या प्रमाणावर खात्मा करण्यात येत आहे.

- Advertisement -

नक्षलवादाला घरघर

वाढती पोलीस कारवाई आणि जनजागृती यामुळे मोठ्या प्रमाणावर नक्षलवादी नक्षली चळवळ सोडून सामान्य जीवन जगत आहेत. त्यामुळेच नक्षलवाद्यांच्या पायाखालची वाळू सरकली असून नक्षलवादी दंतेवाडातील काही गावांमध्ये घुसून लोकांना सशस्त्र नक्षली चळवळीमध्ये सहभाागी होण्यासाठी धमकात आहेत. तसे न केल्यास जीवे मारण्याची देखील धमकी दिली जात आहे. पण, लोकांनी मात्र याकडे साफ दुर्लक्ष केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -