घरट्रेंडिंगREET Exam: कॉपीसाठी लाखमोलाची शक्कल, पायात घातली ६ लाखांची ब्लूटूथ चप्पल

REET Exam: कॉपीसाठी लाखमोलाची शक्कल, पायात घातली ६ लाखांची ब्लूटूथ चप्पल

Subscribe

राजस्थानमध्ये REET परीक्षेच्या दिवशी कॉपी करण्याचा प्रकार पाहून सर्वांनाच धक्का बसला

परीक्षेत कॉपी करुन पास होण्यासाठी आजवर अनेकदा भन्नाट शक्कल लढवल्याचे आपण पाहिले आहे. बाकावर लिहिणे, खिशात चिट लपवणे,रुमाल किंवा हातावर लिहीणे असे अनेक प्रकार आपल्याला माहिती आहेत. अनेकदा परीक्षेच्या वर्गातील खिडकीतून कॉपी करण्यासाठी मदत केल्याचे देखील आपण पाहिले आहे. मात्र राजस्थानमध्ये (Rajasthan) परीक्षेला कॉपी करण्यासाठी साधी सुधी नाही तर महागडी शक्कल लढवण्यात आली आहे. राजस्थानमध्ये पात्रता परीक्षा म्हणजेच REET परीक्षेच्या (REET Exam) दिवशी कॉपी करण्याचा प्रकार पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. परीक्षार्थीने कॉपी करण्यासाठी ब्लूटूथ डिवाइज चप्पल ( Bluetooth slippers)  घातली ज्याची किंमत ही तब्बल ६ लाख रुपये इतकी होती. विद्यार्थांचे चेकींग करताना राजस्थान पोलिसांनी परीक्षार्थीच्या पायातील चप्पलेमधून हे ब्लूटूथ डिवाइज जप्त केले.

- Advertisement -

परीक्षार्थींची कसून चौकशी केल्यानंतर चप्पलमध्ये बसवण्यात आलेले ब्लूटूथ डिवाइज हे परीक्षेत कॉपी करण्यासाठी बसवण्यात आल्याचे सांगण्यात आले. ब्लूटूथ फिटेड चप्पल खरेदी करण्यासाठी ६ लाख रुपये देण्यात आले होते.

कडक बंदोबस्त असताना देखील REET परीक्षेसाठी आलेला एक विद्यार्थी आपल्या चप्पलेत ब्लूटूथ डिवाइज लवपून घेऊन जात होता. परीक्षेला बसण्याआधीच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेनंतर अजमेर जिल्हा पोलिसांनी परीक्षांर्थींना परीक्षा केंद्रापासून २०० मीटर दूर आपल्या चप्पला काढून ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

रविवारी राजस्थानमध्ये अशाप्रकारच्या अनेक घटना समोर आल्यानंतर असे प्रकार रोखण्यासाठी काही जिल्ह्यांमधील मोबाईल इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली होती. त्याचप्रमाणे बिकानेरमध्ये परीक्षेला चप्पलेमार्फत अशा प्रकारचे ब्लूटूथ डिवाइज वापरणाऱ्या ५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

इतर जिल्ह्यांतून देखील काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच परीक्षार्थ्यांना अशाप्रकारे कॉपी करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या दोन हेड कॉन्स्टेबल आणि एका कॉन्स्टेबलचे निलंबन करण्यात आले.

 


हेही वाचा – Afghanistan: दाढी कापण्यावर तालिबानने घातली बंदी; सलूनच्या बाहेर लावली नोटीस

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -