घरदेश-विदेशगुजरातमध्ये ६ हजार कोटींचा कोळसा घोटाळा झाल्याचा आरोप, काँग्रेसकडून चौकशीची मागणी

गुजरातमध्ये ६ हजार कोटींचा कोळसा घोटाळा झाल्याचा आरोप, काँग्रेसकडून चौकशीची मागणी

Subscribe

कोल इंडियाच्या विविध कोळसा खाणींमधून काढण्यात आलेला कोळसा ज्या उद्योगांसाठी काढण्यात आला त्या उद्योगांपर्यंत पोहोचलाच नाही, असे या अहवालात म्हटले आहे.

नवी दिल्ली : गुजरातमध्ये 6 हजार कोटी रुपयांचा कोळसा घोटाळा झाल्याचा दावा करण्यात आला आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, गुजरात सरकारच्या एजन्सींनी राज्यातील लघु आणि मध्यम उद्योगांच्या नावावर कोळसा मागवला पण तो इतर राज्यांना महागड्या किमतींमध्ये विकला. मात्र काँग्रेसकडून आता या घोटाळ्याला चारा घोटाळ्याचा बाप असल्याचे म्हणत या घोटाळ्यात कोणाचा हात आहे याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सिंह सुरजेवाला यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘गुजरात सरकारमध्ये 6,000 कोटी रुपयांचा कोळसा घोटाळा! खाणीतून 60 लाख टन कोळसा आला आणि गायब झाला. भाजप सरकारने 4 खाजगी कंपन्यांना कोळसा आणण्यासाठी अधिकृत परवानगी दिली मात्र यातील तीन कंपन्यांचे पत्ते बनावट निघाले. कदाचित उत्तर येईल- ‘कोणी कोळसा आणला नाही, कोळसा आला नाही’, प्रकरण बंद झाले, पैसे पचले!’ हा अहवालही त्यांनी ट्विट केला आहे. काँग्रेसचे दुसरे नेते संजय निरुपम यांनी देखील यांदर्भात ट्विट केले आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की, ‘गुजरातमधील कोळसा घोटाळा हा चारा घोटाळ्याचा बाप आहे. खाणीतून 60 लाख टन कोळसा बाहेर आला. वाटेतच गायब झाला. 6000 कोटींची लूट केली. या दरोड्यात कोणाचा हात आहे, याचा तपास होणे गरजेचे आहे.

- Advertisement -

दरम्यान दैनिक भास्कर या वृत्तसंस्थेच्या अहवालात गुजरातमध्ये सुमारे 6 हजार कोटी रुपयांचा कोळसा घोटाळा समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. गेल्या 14 वर्षात गुजरात सरकारच्या अनेक एजन्सी लघु आणि मध्यम उद्योगांना कोळसा देण्यापेक्षा तोच कोळसा जादा दराने अन्य राज्यांतील उद्योगांना विकून त्यांनी पाच हजार ते सहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे.

कोल इंडियाच्या विविध कोळसा खाणींमधून काढण्यात आलेला कोळसा ज्या उद्योगांसाठी काढण्यात आला त्या उद्योगांपर्यंत पोहोचलाच नाही, असे या अहवालात म्हटले आहे. कागदपत्रांचा हवाला देत अहवालात दावा करण्यात आला आहे की, कोल इंडियाच्या खाणीतून आतापर्यंत गुजरातमधील व्यापारी आणि लघु उद्योगांच्या नावावर 60 लाख टन कोळसा पाठवण्यात आला आहे. त्याची सरासरी किंमत 1,800 कोटी रुपये प्रति टन 3,000 रुपये आहे, परंतु व्यापारी आणि उद्योगांना तो विकण्याऐवजी 8 ते 10 हजार रुपये प्रति टन या दराने इतर राज्यांमध्ये विकून काळाबाजार केला जात आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -