धक्कादायक! वृद्ध पुजाऱ्यानं केला १० वर्षीय चिमुकलीवर बलात्कार

आरोपीने मुलीला आवाज देऊन बोलावले आणि गोड खाऊ देण्याचे आमिष मुलीला देत अत्याचार केला.

प्रातिनिधीक फोटो

मंदिराच्या पुजाऱ्याने चिमुरडीवर बलात्कार केल्याचा लज्जास्पद प्रकार समोर आला आहे. या पुजाऱ्याचे वय ६२ वर्षीय असून १० वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार २४ नोव्हेंबर रोजी बंगळुरूतील देवाणहल्ली भागात घडला आहे.

असा घडला प्रकार

६२ वर्षीय आरोपीचे नाव वेंकटरामणप्पा असे आहे. मंदिरात पुजाऱ्याचे काम करतो. आरोपी आपल्या मुलीची भेट घेण्यासाठी तिच्या घरी आला होता. देवाणहल्ली परिसरात मुलगी राहते. वेंकटरामणप्पा याचा जावई चौडेश्वरी मंदिरात पुजारी आहे. जावई शहराबाहेर गेलेला असल्याने वेंकटरामणप्पा मंदिरातील नित्य पूजा करण्याच्या मदतीसाठी मुलीकडे आला होता. हा प्रकार घडला त्या दिवशी दुपारी वेंकटरामणप्पा हे घरात होते. दुपारी ४.३० वाजेदरम्यान आरोपीला घराच्या परिसरात खेळणारी मुलगी दिसली. आरोपीने मुलीला आवाज देऊन बोलावले आणि गोड खाऊ देण्याचे आमिष मुलीला देत अत्याचार केला.

दरम्यान खूप वेळ चिमुरडी घरात न दिसल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. मंदिराबाहेर फुल विक्रेत्या महिलेने मुलीच्या कुटुंबीयांना माहिती देताना असे सांगितले की, या मुलीला मंदिर पुजाऱ्यासह त्याच्या घरात जाताना पाहिलं. यावेळी मंदिर पुजाऱ्याच्या घरात मुलीचे कुटुंबीय घरात पोहोचले. तेव्हा मुलगी घाबरलेल्या आवस्थेत रडताना दिसली. मुलीनी घरच्यांना घडलेले सारंकाही सांगितले. मुलीच्या घरच्यांनी घडलेल्या प्रकाराची पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मुलीला तिच्या कुटुंबीयांसोबत वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आहे.

याप्रकरणी, पोलिसांनी मंदिर पुजाऱ्याला ताब्यात घेतले. आणि त्याच्या विरुद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


लिव्ह-इनमध्ये राहिली गरोदर; प्रियकरानेच काटा काढून जेसीबीने पुरले वडिलांच्याच शेतात