Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश देह विक्रीसाठी चिनी मुलांनी पाकिस्तानी मुलींशी केले लग्न!

देह विक्रीसाठी चिनी मुलांनी पाकिस्तानी मुलींशी केले लग्न!

Subscribe

चीन मधल्या मुलांनी पाकिस्तानच्या ६२९ मुलींना लग्नाचं अमिष दाखवून फसवलं

चीन आणि पाकिस्तानचा संबंध किती चांगला आहे हे सगळ्याचं माहित आहे. मात्र याच चीन मधल्या मुलांनी पाकिस्तानच्या ६२९ मुलींना लग्नाचं अमिष दाखवून फसवलं असल्याचं समोर आलं आहे. चीनमधील मुलांसोबत लग्न करून चीनमध्ये राहू असं स्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तानी मुलींना चक्क लग्न केल्यानंतर देह विक्रीच्या व्यवसायात ढकललं जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. चीन मधील ही सर्व मुलं पाकिस्तान मधील वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या मुलींशी लग्न करत आणि त्यानंतर चीनमध्ये नेऊन त्यांना देहव्यापारा करीता विकलं जात होत. पण आता या सर्व मुलींना पाकिस्तानमध्ये सुखरूप आणलं गेलं आहे. या प्रकरणाचा तपास पाकिस्तानमधील तपास एजन्सी करीत आहे.

मानव तस्करीच्या शिकार झालेल्या या मुली गरीब कुटुंबातील असतात. या मुलींची मानव तस्करीत फसल्यानंतर दयनीय अवस्था होते. सुरुवातीला मानवी तस्करीत अडकलेल्या महिला तपासात सहकार्य करतात. पण त्यानंतर त्या सहकार्य करीत नाही. त्यांच्यावर सामाजिकदबाव असून त्यांना धमकावले देखील जाते. त्यामुळे त्याचे कुठेही नाव छापू शकतं नाही. फैसलाबाद कोर्टाने ऑक्टोबर महिन्यात पुराव्या अभावी ३१ चिनी नागरिकांची मानव तस्करीतून सुटका केली होती. ही सुटका झाल्यानंतर मानव तस्करीच्या घटनेते पाकिस्तानात वाढ झाली आहे.

- Advertisement -

पाकिस्तानच्या मुलींसोबत लग्नाचं आश्वासन देऊन चीनमधील असंख्य तरुणींचा चीनमध्ये नेले. चीनमध्ये नेल्यानंतर त्यांना पत्नी ऐवजी देहव्यापाराकरिता विक्री केली जात होती. हे सर्व घडल्यामुळे त्या सर्व मुलींना मानसिक धक्का बसला आहे. पण त्या सर्व मुलींना सुदैवाने पाकिस्तानमध्ये पुन्हा आणण्यात आलं आहे.


हेही वाचा – ‘कंडोम सोबत ठेवा आणि बलात्काऱ्यांना सहकार्य करा’


- Advertisement -

 

- Advertisment -