घरदेश-विदेशCorona Vaccination: देशातील ६३ टक्के पालक लहान मुलांच्या लसीकरणाच्या प्रतिक्षेत!

Corona Vaccination: देशातील ६३ टक्के पालक लहान मुलांच्या लसीकरणाच्या प्रतिक्षेत!

Subscribe

गेल्या दीड वर्षांपासून कोरोना व्हायरस देशात कहर करत आहे. कोरोनाच्या या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान कोरोना लसीकरण मोहीम देखील वेगाने सुरू आहे. मात्र देशात कोरोनाची तिसरी संभाव्य लाट येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना लहान मुलांना कोरोनाची लस कधी देण्यात येणार याच्या प्रतिक्षेत देशातील कित्येक पालक आहेत. दरम्यान, वर्धमान महावीर वैद्यकीय महाविद्यालय आणि सफदरजंग रुग्णालयाच्या कम्युनिटी मेडिसीन विभागाने केलेल्या सर्वेक्षण अहवालानुसार, देशातील ६३ टक्क्यांहून अधिक पालकांना त्यांच्या मुलांना कोरोनाविरोधी लस लवकरात लवकर देण्यात यावी, याची ते वाट पाहत असल्याचे एक सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात देशभरातून ४६७ लोकांनी आपला सहभाग दर्शवला होता.

देशभरातील ४६७ सहभागींपैकी आरोग्य कर्मचारी, गृहिणी, विद्यार्थी, सेवानिवृत्त कर्मचारी इत्यादींचा सर्वेक्षणात समावेश करण्यात आला. ही माहिती नुकतीच जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अँड प्राइमरी केअर मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. सफदरजंग रुग्णालयाच्या कम्युनिटी मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. जुगल किशोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकांमध्ये मुलांना लसीकरण करण्याचा कल खूप चांगला होता. यामुळे लसीकरण मोहीम अधिक वेगवान होण्यास मदत होईल. या सादर करण्यात आलेल्या अहवालात, ६३.१ टक्के लोक आपल्या मुलांना कोरोनाविरोधी लस देण्यासाठी तयार होते.

- Advertisement -

या सर्वेक्षणात ७०.४४ टक्के लोक कोरोना लस घेण्यास तयार होते, तर २९.५५ टक्के लोकांना लस घेण्यास नकार दिल्याचे दिसले. ७२.५८ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेण्यास सहमती दर्शविली. तर २७.४१ टक्के लोकांना लस घ्यायची नाही, असे त्यांनी सांगितले. तर आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणारे ६८.८ टक्के लोक लस घेण्यासाठी तयार होते, उर्वरित ३१.१ टक्के लोक तयार नव्हते. तसेच ४४.३ टक्के लोकांनी ओरल लसीकरण आणि ५५.६ टक्के लोकांनी इंजेक्शनद्वारे लस घेण्यास प्राधान्य दिले. ४९.४ टक्के लोकांनी लसीच्या सुरक्षेबाबत विश्वास व्यक्त केला. तर या सर्वेक्षणात महिलांपेक्षा पुरुष लस घेण्यास अधिक इच्छुक असल्याचे समोर आले.


 

- Advertisement -

 

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -