घरताज्या घडामोडीCoronavirus: पाकिस्तानमध्ये २४ तासांत आढळले कोरोनाचे ६४०० रुग्ण

Coronavirus: पाकिस्तानमध्ये २४ तासांत आढळले कोरोनाचे ६४०० रुग्ण

Subscribe

जगातील कोरोनाबाधितांच्या यादीत पाकिस्तान १५ व्या स्थानावर आहे.

शेजारील पाकिस्तान देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत पाकिस्तानमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. २४ तासांत ६ हजार ४०० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच आतापर्यंत एकूण कोरोनाबाधितांचा आकडा सव्वा लाखांहून अधिक झाला आहे.

पाकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये २४ तासांत १०७ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण मृतांचा आकडा २ हजार ५०० पर्यंत पोहोचला आहे. तसेच आतापर्यंत ४० हजारांहून अधिक लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

पाकिस्तानात सर्वाधिक कोरोनाबाधित प्रदेश पंजाब आणि सिंध आहे. याशिवाय पाकिस्तान अधिकृत काश्मीरमध्ये १ हजार ५०० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत पाकिस्तानात ८ लाख कोरोनाच्या चाचण्या झाल्या आहेत. संपूर्ण देशात दररोज २५ हजार चाचण्या घेतल्या जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

पाकिस्तानाच कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढत असला तरी संपूर्णपणे लॉकडाऊन जारी करण्यात आलेला आहे. काही प्रदेशाने स्वतः लॉकडाऊन जारी केला. पण फेडरेल सरकारने असे करण्यास नकार दिला.

- Advertisement -

कोरोनाच्या या संकटामुळे पाकिस्तान खूप नुकसान झाले आहे. सरकारने आपल्या सर्वेक्षणात कबूल केले आहे की, यादरम्यान पाकिस्तानचे सुमारे ३ ट्रिलियन रुपयांचे नुकसान झाले आहे. आता पाकिस्तानात लॉकडाऊनमध्ये पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचे रुग्ण आणखी वाढताना दिसत आहेत. जगातील कोरोनाबाधितांच्या यादीत पाकिस्तान १५ व्या स्थानावर आहे. पाकिस्तानने कोरोनाबाधित रुग्णांचा आकड्यात चीन देखील मागे टाकले आहे.


हेही वाचा – भारताने कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत ब्रिटनला टाकलं मागे, सर्वाधिक रुगसंख्येत चौथ्या स्थानावर!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -