घरताज्या घडामोडीअजब प्रेमाची गजब कहाणी! २८ वर्ष लिव्ह इन, साठी ओलांडल्यानंतर लग्न

अजब प्रेमाची गजब कहाणी! २८ वर्ष लिव्ह इन, साठी ओलांडल्यानंतर लग्न

Subscribe

मुलं,सुना,नातवंडांनी त्यांच्या लग्नाला उपस्थिती लावली.

सध्या लग्नपेक्षा लिव्ह इन रिलेशनशिपला सर्वात जास्त महत्त्व मिळताना दिसत आहे. सध्याच्या तरुणांमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपची प्रचंड क्रेझ आहे. लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या काहीच जणांची लव्ह स्टोरी सक्सेस होते तर काहींची फ्लॉप. उत्तर प्रदेशमधून लिव्ह इनमध्ये रहाणाऱ्या एका अजब प्रेमाची गजब कहाणी समोर आली आहे. एक प्रेमी युगुल तब्बल २८ वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यानंतर आता वयाची साठी ओलांडल्यानंतर दोघेही विवाहबंधनात अडकले आहेत. तब्बल २८ वर्ष थांबून दोघांनीही आता आपल्या लेकी, सुना, मुलं, नातवंडाच्या उपस्थितीत धुमधडाक्यात लग्न केले. ही गोष्ट आहे उत्तर प्रदेशच्या अमेठी जिल्ह्यातील. ६५ वर्षांचे मोतीलाल आणि ६० वर्षांची मोहिनी देवी यांनी तब्बल २८ वर्षे लिव्ह इन मध्ये राहून आता विधिवत लग्न केले आहे. (65 years old man got married with 60 years old women after 28 years of living in ralationship)

इतक्या वर्षांनी लग्न करण्यासाठी दोघांमध्ये प्रचंड उत्साह होता. अगदी थाटामाटात दोघांचा विवाह सोहळा पार पडला. दोघांच्या लग्नाची पत्रिका संपूर्ण गावभर वाटण्यात आली. लग्नातले सगळे विधी करण्यात आले. मुलं,सुना,नातवंडांनी त्यांच्या लग्नाला उपस्थिती लावली. त्यांच्या मुली त्यांच्या वरातीत नाचताना दिसल्या. हिंदू पद्धतीने दोघांचा विवाह पार पडला. लग्नात संगित सोहळा आयोजित करण्यात आला होता. गावातील सर्व नातेवाईकांही देखील त्यांच्या लग्नाला उपस्थिती लावून वर वधूला आशिर्वाद आणि शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -

मोतीलाल यांनी २८ वर्षांपूर्वी मोहिनी देवी यांना घेऊन घरी आले होते. मात्र त्यावेळी त्यांच्या मुला मुलींच्या विवाहात अडथळा येऊ नये यासाठी ते अविवाहीत राहिले. आता मुलांची लग्न होऊन त्यांना मुले झाली आहेत. त्यांचा संसार मार्गी लागल्यानंतर मोतीलाल आणि मोहिनी देवी यांनी एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या नात्याला आता समाजाने देखील मान्यता दिली आहे.


हेही वाचा – Gold Jewelley : एक व्यक्ती किती सोनं स्वत:कडे ठेवू शकते? जाणून घ्या केंद्राचा कायदा

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -