घरट्रेंडिंगकमोडवर बसला आणि साप चावला

कमोडवर बसला आणि साप चावला

Subscribe

कमोडवरून उठून पाहताच त्याची झोपच उडाली.

अनेकांना प्राण्यांप्रती जिव्हाळा असतो. त्यामुळे अनेकांच्या घरात कुत्रा,मांजर यासारखे पाळीव प्राणी असतात. काही अवलीयांना मात्र सापासारखे विषारी आणि भयानक प्राण्यांसोबत मैत्री करायला आवडते. साप पाहून अनेकांची तारांबळ उडते. पण तोच साप जर तुमच्या कमोडवर आला तर विचार करा कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागले. असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे ऑस्ट्रियाच्या ग्राज शहरात. बाथरुमसाठी टॉयलेटमध्ये गेल्यावर कमोडच्या आता असलेल्या विषारी सापाने एका ६५ वर्षीय वृद्धाला दंश केला आहे. (65 years old man Sat on commode and was bitten by snake in austria) या माणसाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्याचा जीव वाचला. हा सगळा प्रकार घडला तो म्हणजे त्या वृद्धाच्या प्राणीप्रेमी शेजाऱ्यामुळे. त्यांच्या शेजाऱ्याने त्याच्या घरात तब्बल ११ साप पाळले होते.

डेली मेल च्या रिपोर्टनुसार, ६५ वर्षांचा माणूस सकाळी सकाळी आपली नैसर्गिक विधी आटोपण्यासाठी बाथरुम गेला होता. टॉयलेट सीटवर बसताच सीटखाली काही तरी असल्याचे जाणवले. त्याने सीटवरुन उठून पाहताच त्याची झोपच उडाली. टॉयलेट सीटच्या खाली एक विषारी साप वेटोळे मारुन बसला होता. त्या व्यक्तीला काही कळण्याआधीच विषारी सापाने त्याच्या प्राइव्हेट पार्टला दंश केला होता. त्या व्यक्तींने तात्काळ पोलिसांना कळवले व रुग्णालयात धाव घेतली. नशीबाने त्या व्यक्तीवर कोणताही भयानक परिस्थिती उद्भवली नाही.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्धाच्या घरातील कमोडमध्ये साप आढळून आला. हा साप त्याच्या शेजाऱ्यांच्या घरातून आला होता. त्यांच्या शेजाऱ्यांनी तब्बल ११ साप पाळले आहेत. तो साप त्यांच्या शेजाऱ्यांच्या घरात सापडला. वृद्धाला चावल्यानंतर तो साप शेजाऱ्यांच्या घरी परतला. नाल्याच्या माध्यमातून हा साप वृद्धाच्या घरी आल्याचे त्यांनी सांगितले. वृद्धांच्या शेजारी राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणाकडे ११ वेगळ वेगळ्या प्रकारचे साप आहेत. त्याच्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या डिझाइनचे पिंजरे  तयार केले आहेत. त्यांचा एक साप पिंजऱ्यातून बाहेर पडून शेजाऱ्यांच्या घरात गेल्याचे त्यांना माहिती नव्हते. या घटनेनंतर २४ वर्षीय तरुणाला सापासारखे प्राणी पाळल्याने पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या घरातील ११ सापांची माहिती स्थानिक अॅनिमल सर्विसला दिली आहे.


हेही वाचा – राशिदने गोल्फ स्टीकने मारला हेलिकॉप्टर शॉट, पीटरसन ट्रोल करताना म्हणाला…

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -