घरताज्या घडामोडी6G Internet : चीनचे 6G टेक्नॉलॉजीचे संशोधन, 5G पेक्षा अधिक वेगाने इंटरनेट...

6G Internet : चीनचे 6G टेक्नॉलॉजीचे संशोधन, 5G पेक्षा अधिक वेगाने इंटरनेट स्पीड

Subscribe

चीनने 6G टेक्नॉलॉजीवर नवे संशोधन केले आहे. चीनने म 6G मोबाईल इंटरनेटमध्ये यश मिळवल्याचा दावा केला आहे. एका वृत्तानुसार, अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, चीनने 5G पेक्षा अधिक इंटरनेट स्पीडवर संशोधन केला आहे. चीनमधील संशोधकांनी 206.25 गिगाबिट प्रति सेकंद असा जागतिक विक्रमी वायरलेस ट्रान्समिशन स्पीड मिळवला आहे.

संपूर्ण जग हे विज्ञानामुळे प्रगतीपथावर जाऊन पोहोचले आहे. मानवाच्या मूलभूत गरजांमध्ये या डिजीटल युगात मोबाईल इंटरनेटची भर पडली आहे. त्यातच चीनने 6G टेक्नॉलॉजीवर नवे संशोधन सुरु केले आहे. चीनने 6G मोबाईल इंटरनेटमध्ये यश मिळवल्याचा दावा केला आहे. एका वृत्तानुसार, अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, चीनने 5G पेक्षा अधिक इंटरनेट स्पीडवर यशस्वी संशोधन केले आहे. चीनमधील संशोधकांनी 206.25 गिगाबिट प्रति सेकंद असा जागतिक विक्रमी वायरलेस ट्रान्समिशन स्पीड मिळवला आहे. त्यामुळे आता 5G पेक्षा 100 पट वेगाने इंटरनेट चालणार आहे.

16 सेकंदात 59.5 तासांचे मार्वेल सिनेमॅटिक युनिव्हर्स सिनेमा डाउनलोड करु शकता. इतका इंटरनेट स्पीड होणार असून, 206.25 गिगाबिटचा वेग खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे. त्यामुळे फार वेळखाउ डाऊनलोडिंगसाठी काही सेकंदात डाऊनलोड झाल्याने युजर्सना याचा फायदा होणार आहे. याशिवाय युजर्सना संपूर्ण 59.5 तासांचे सर्व मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स चित्रपट केवळ 16 सेकंदात 4K मध्ये डाउनलोड करता येऊ शकतात. 6G इंटरनेट हे 2030च्या आसपास मार्केटमध्ये येणार असल्याची माहीती संशोधकांनी दिली आहे. जर हे संशोधन खरे असेल तर, 5G हे सर्वांत कमी काळ टिकणारे मोबाईल इंटरनेट ठरेल. परंतु 5G इंटरनेट हे अजूनही जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे बाकी आहे.

- Advertisement -

चीनने बनवला ‘मेड इन चायना सन’

सध्या जगभरामध्ये चीनने केलेल्या संशोधनाची चर्चा सुरु आहे. यावेळी चीनने कृत्रिम सूर्याचं संशोधन केलं आहे. चीनचा ऊर्जा निर्मिताचा प्रयोग यशस्वी झाला आहे. इतकंच नाही तर या सूर्यापासून त्यांनी अधिक ऊर्जा मिळण्यास सुरूवात केली आहे. मात्र आता तुम्ही विचारात पडला असला की आता दोन सूर्य तयार झाले असून, ग्रहमालिकेत दोन दोन सूर्य असतील तर दिवस रात्र कसे होणार असे प्रश्न तुम्हाला देखील पडले असतील.चीनने तयार केलेला सूर्य हा एखाद्या ग्रहाप्रामाणे नसून हा कृत्रिम सूर्य तयार केला आहे.


हेही वाचा – CoronaVirus Updates : देशात आज कोरोनाचे 1 लाख 41 हजार नवे रुग्ण, तर 285 रुग्णांचा मृत्यू

- Advertisement -

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -