घरदेश-विदेशपापुओ न्यू गिनीमध्ये ७.७ रिश्टर स्केलचा भूकंप, त्सुनामीचाही धोका वर्तवला

पापुओ न्यू गिनीमध्ये ७.७ रिश्टर स्केलचा भूकंप, त्सुनामीचाही धोका वर्तवला

Subscribe

जर रिश्टर स्केलवर 7 किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा भूकंप झाला, तर आजूबाजूच्या 40 किमीच्या त्रिज्येत हा हादरा अधिक तीव्र असतो.

पोर्ट मोरेस्बी – पापुआ न्यू गिनीमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7.7 इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपानंतर आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाल्याने लोकांनी घराबाहेर धाव घेतली. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने त्सुनामीचा इशाराही जारी केला आहे. तसेच, भूकंपाच्या तीव्रतेमुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. इंडोनेशियाजवळील पॅसिफिक महासागर क्षेत्रातील पापुआ न्यू गिनी हा देश भूकंपासाठी अत्यंत असुरक्षित आहे. राजधानी पोर्ट मोरेस्बीपासून सुमारे 60 किमी अंतरावर लाय येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता.

भूकंप का होतात जाणून घ्या?

- Advertisement -

पृथ्वी प्रामुख्याने चार थरांनी बनलेली आहे. आतील गाभा, बाह्य गाभा, आवरण आणि कवच. कवच आणि वरच्या आवरणाच्या गाभ्याला लिथोस्फीअर म्हणतात. हा 50 किमी जाडीचा थर टेक्टोनिक प्लेट्स नावाच्या अनेक विभागांमध्ये विभागलेला आहे. या टेक्टोनिक प्लेट्स त्यांच्या जागी कंपन करत राहतात आणि जेव्हा ही प्लेट खूप कंपन करते तेव्हा भूकंप जाणवतो.

भूकंपाचा केंद्रबिंदू आणि तीव्रता याचा अर्थ काय आहे हे जाणून घ्या?

- Advertisement -

भूकंपाचा केंद्रबिंदू हे ठिकाण आहे ज्याच्या खाली प्लेट्सच्या हालचालीमुळे पृथ्वी थरथरू लागते. या ठिकाणी किंवा आसपासच्या भागात भूकंपाचा प्रभाव अधिक असतो. जर रिश्टर स्केलवर 7 किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा भूकंप झाला, तर आजूबाजूच्या 40 किमीच्या त्रिज्येत हा हादरा अधिक तीव्र असतो.

२००४ सालीही आली होती त्सुनामी

त्सुनामीने २६ डिसेंबर २००४ रोजी कहर केला होता. या त्सुनामीच्या कचाट्यात श्रीलंका, इंडोनेशियासह अनेक देश आले होते. तसेच, भारताचे किनारपट्टीचे टोक आणि समुद्रकिनारी वसलेली अनेक देशांची शहरेही त्सुनामीत भरडली गेली होती. या काळात, उंच इमारती कोसळल्या होत्या, त्यामुळे मोठ्याप्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -