घरदेश-विदेशहिमाचल प्रदेश : सोलन येथे चार मजली इमारत कोसळली; ७ जणांचा मृत्यू,...

हिमाचल प्रदेश : सोलन येथे चार मजली इमारत कोसळली; ७ जणांचा मृत्यू, २३ जखमी

Subscribe

हिमाचल प्रदेशच्या सोलन येथे रविवारी रात्री इमारत कोसळण्याची मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून २३ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हिमाचल प्रदेशच्या सोलन रविवारी येथे चार मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून २३ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ६ जवानांचा समावेश आहे. एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून रात्रभर शोधकार्य सुरु आहे. सध्या बचावकार्य सुरु असून संततधार पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहे. दरम्यान, अजूनही ३७ जण अडकले असल्याची माहिती समोर येत आहे. तर २३ जणांचा वाचवण्यात यश आले आहे. याशिवाय मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दुपारपर्यंत शोध मोहिम संपण्याची शक्यता

दरम्यान, सोलनचे डी. वाय. कमिशनर के. सी. चमन यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, आतापर्यंत १७ जवान आणि ११ नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. तर ६ जवान आणि १ नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय, सध्या शोध कार्य युद्ध पातळीवर सुरु असून आज दुपारपर्यंत शोध मोहिमेचे काम पूर्ण होईल.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -