घरताज्या घडामोडीब्रिटनमध्ये AstraZenecaची लस घेतलेल्या ७ जणांचा रक्ताच्या गुठळ्या होऊन मृत्यू

ब्रिटनमध्ये AstraZenecaची लस घेतलेल्या ७ जणांचा रक्ताच्या गुठळ्या होऊन मृत्यू

Subscribe

जगभरात कोरोना रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. जगात पहिल्यांदा ब्रिटनने ८ डिसेंबरला कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली होती. ब्रिटनमधून कोरोना लसीबाबत एक धक्कादायक घटना समोर येत आहे. ऑक्सफोर्ड आणि एस्‍ट्राजेनेकाची लस घेतलेल्या ३० लोकांपैकी सात जणांचा रक्ताच्या गुठळ्या होऊन मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती ब्रिटनमध्ये वैद्यकीय नियंत्रक दिली आहे. ही मृत्यूची घटना शनिवारी वैद्यकीय नियंत्रक मंडळाने मान्य केली असून त्याचे असे म्हणणे आहे की, जेव्हापासून लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या होत असल्याच्या घटनांसंबंधित शंका उपस्थित केला जात होत्या तेव्हापासून अनेक युरोपियन देशांनी या लसीच्या वापरावर बंदी घातली होती.

ब्रिटनच्या Medicines and Healthcare products Regulatory Agency (MHRA)ने याबाबत सांगितले की, २४ मार्चपर्यंत ज्या ३० लोकांच्या रक्तामध्ये गुठळ्या होण्याच्या प्रकरणात दुर्दैवाने सात जणांचा मृत्यू झाला. माहितीनुसार ब्रिटनमध्ये एस्‍ट्राजेनेकाच्या लसीचे १८.१ मिलियन लोकांना डोस देण्यात आले आहेत. अशातच रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या घटनेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

- Advertisement -

३० पैकी २२ जणांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याची समस्या दिसली. ज्याला cerebral venous sinus thrombosis म्हटले जाते. उर्वरित आठ जणांमध्ये ‘घनास्रता’ (थ्रोम्बोसिस/Thrombosis) पाहायला मिळाला, ज्यामध्ये रक्तपेशी कमी होताना दिसत होत्या. यामुळेच रक्तांच्या गुठळ्यात होता, असे म्हटले जाते. दरम्यान या घटनेनंतर ब्रिटन वैद्यकीय नियंत्रकने सांगितले की, फायझर-बायोटेक लसीचे असे कोणते प्रकरण आढळले नाही आहे, असे स्पष्ट केले.


हेही वाचा – ५० पेक्षा अधिक वयासाठी का दिली जातेय कोरोना लस, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -