घरदेश-विदेशछत्तीसगडमध्ये ७ नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगडमध्ये ७ नक्षलवाद्यांचा खात्मा

Subscribe

छत्तीसगडमध्ये सुरक्षादलांनी केलेल्या कारवाईमध्ये ७ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.यामध्ये ३ महिला नक्षलवाद्यांचा देखील समावेश आहे.

नक्षलवाद्यांविरोधातली कारवाई दिवसेंदिवस अधिक जोमाने राबवली जात आहे. छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील तिमीनर आणि पुशनर गावाजवळ केलेल्या कारवाईमध्ये सात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. यामध्ये ३ महिला नक्षलवाद्यांचा देखील समावेश आहे. आज ( गुरूवारी ) सकाळी ६ वाजता सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईमध्ये ७ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास सुरक्षादलांना  यश आले. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे नक्षलवादविरोधी दलाने बिजापूर जिल्ह्यातील जंगलामध्ये शोध मोहिम राबवली. छत्तीसगडची राजधानी रायपूरपासून ४५० किमी अंतरावर ही कारवाई करण्यात आली. यावेळी दोन्ही बाजुने जोरदार गोळीबार झाला. अखेर ७ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले. यावेळाी काही शस्त्रसाठा देखील घटनास्थळावरून जप्त करण्यात आला आहे. यापूर्वी सुरक्षा दलांवर केल्या गेलेल्या हल्ल्यांमध्ये देखील अनेक जवान शहीद झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -