घरदेश-विदेशArvind Kejriwal : केजरीवालांच्या अटकेनंतर आपचे 10 पैकी 7 खासदार गायब; काय...

Arvind Kejriwal : केजरीवालांच्या अटकेनंतर आपचे 10 पैकी 7 खासदार गायब; काय आहे कारण?

Subscribe

दिल्ली उच्च न्यायालयानेही अरविंद केजरीवाल यांच्याकडून कट रचून दिल्ली मद्य धोरणाला परवानगी दिल्याचे म्हणत अटकेला आव्हान देणारी त्यांची याचिका फेटाळली आहे. यानंतर आता आम आदमी पार्टी (AAP) अडचणीत साडपला आहे. कारण दिल्लीत तसेच देशाच्या इतर भागांमध्ये झालेल्या निदर्शनांदरम्यान आपचे सुमारे 7 खासदार गायब असल्याचे पाहायला मिळत आहे. 

नवी दिल्ली : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. या संपूर्ण घोटाळ्याचे सूत्रधार केजरीवाल असल्याचा ईडीचा दावा आहे. अशातच आता दिल्ली उच्च न्यायालयानेही अरविंद केजरीवाल यांच्याकडून कट रचून दिल्ली मद्य धोरणाला परवानगी दिल्याचे म्हणत अटकेला आव्हान देणारी त्यांची याचिका फेटाळली आहे. यानंतर आता आम आदमी पार्टी (AAP) अडचणीत साडपला आहे. कारण दिल्लीत तसेच देशाच्या इतर भागांमध्ये झालेल्या निदर्शनांदरम्यान आपचे सुमारे 7 खासदार गायब असल्याचे पाहायला मिळत आहे.

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर दिल्लीत आणि देशाच्या इतर भागांमध्ये आपच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शन करण्यात येत आहे. मात्र या निदर्शनातून आपचे 10 पैकी 7 खासदार गायब आहेत. मात्र अरविंद केजरीवाल यांच्यासोबत संजय सिंह हे सध्या जामिनावर बाहेर आल्यानंतर ‘आप’चा चेहरा बनत आहेत. त्यांच्याशिवाय, आपचे राष्ट्रीय सरचिटणीस संदीप पाठक आणि एनडी गुप्ता हेदेखील निर्दशनादरम्यान, सक्रिय दिसत आहेत.

- Advertisement -

राघव चड्डा शस्त्रक्रियेसाठी लंडनमध्ये

पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा हे गेल्या महिन्यात डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी लंडनला गेले होते. मार्चच्या अखेरीस ते परतणार होते, मात्र अद्यापही ते लंडनमध्येच आहेत. शस्त्रक्रियेनंतर त्यांना सूर्यप्रकाश टाळण्यास डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांना भारतात परतण्यास उशीर होत आहे. डॉक्टरांनी परवानगी दिल्यास ते भारतात येतील अशी माहिती आपच्या एका नेत्याने दिली. मात्र केजरीवाल यांच्या अटकेनंतर राघव चढ्ढा सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. तसेच संजय सिंग हे बाहेर आल्यानंतरही त्यांनी आनंदही व्यक्त केला होता.

स्वाती मालीवाल सध्या अमेरिकेत

पहिल्यांदाच दिल्लीतून खासदार झालेल्या स्वाती मालीवाल या सध्या अमेरिकेत आहेत. त्यांची बहीण आजारपणातून बरी होत असल्याने त्यांना तिथे राहण्याची गरज असल्याचे स्वाती मालीवाल यांनी पक्षाला सांगितले आहे. मालीवाल पक्षासाठी सतत पोस्ट करत आहेत. आपचे अनेक नेते केजरीवाल यांच्या समर्थनार्थ पुढे येत नसल्याचा आरोप भाजपाने केला होता. मात्र मालीवाल यांनी हे वृत्त फेटाळले आहे.

- Advertisement -

अशोक कुमार मित्तल अनुपस्थित

पंजाबस्थित लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक आणि आपचे खासदार अशोक मित्तल हे आपच्या निदर्शनात सक्रिय नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांना माध्यमांनी याबाबत विचारले असता ते म्हणाले की, पक्षाच्या आंदोलनाबाबत बोलण्याचा मला अधिकार नाही. पक्षाचे मुख्यालय काय करायचे ते मला सांगेल. परंतु पक्षाने नुकत्याच आयोजित केलेल्या आंदोलनात आपल्याला निमंत्रित केले नाही, असा दावा केला आहे.

संजीव अरोरा लुधियानात पक्षाच्या कामात व्यस्त 

पंजाबचे दुसरे खासदार संजीव अरोरा यांनी रामलीला मैदानावरील भारत आघाडीच्या आंदोलनात भाग न घेतल्याचे मान्य केले आहे. त्यांनी सांगितले की, केजरीवाल यांच्या अटकेनंतर त्यांची पत्नी सुनीता केजरीवाल यांची 24 मार्च रोजी भेट घेतली होती. सध्या मी लुधियानामध्ये पक्षाच्या कामात व्यस्त असल्याने उपस्थित राहू शकत नाही. माझ्यावर दिलेली जबाबदारी मी नेहमीच पार पाडली आहे. राज्यसभेतील आमचे नेते एनडी गुप्ता यांच्याशी मी सतत संपर्कात आहे. त्यामुळे जर मला आंदोलनासाठी येण्यास सांगितले तर नक्की येईल, असं संजीव अरोरा यांनी स्पष्ट केलं.

बलबीर सिंग सीचेवाल निदर्शनातून गायब

पंजाबमधील आपचे राज्यसभा खासदार बलवीर सिंग सीचेवाल हेही पक्षाच्या बहुतांश निदर्शनांमधून गायब आहेत. त्यांना त्याच्या अनुपस्थितीबद्दल विचारले असता ते म्हणाले की, मी एक धार्मिक व्यक्ती असून माझे कर्तव्य बजावत आहे. काही योजना असतील तर त्या आम्ही सामायिक करू.

विक्रमजीत सिंह साहनी यांचे माैन

विक्रमजीत सिंह साहनी हे इतर खासदारांप्रमाणेच आम आदमी पक्षाच्या कामकाजातही मोठ्या प्रमाणावर अनुपस्थित असतात. केजरीवाल यांच्या अटकेवर त्यांनी मौन बाळगले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी आणि लेखक खुशवंत सिंग यांच्या स्मरणार्थ आयोजित मेळाव्यातील त्यांच्या संवादाचे व्हिडिओ केले आहेत.

हरभजन सिंग आयपीएलमध्ये व्यस्त

भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन पंजाबमधून राज्यसभेचा खासदार झाल्यापासून तो आपच्या कार्यात क्वचितच सहभागी झाला आहे. केजरीवाल यांच्या अटकेवरनंतरही त्याने मौन बाळगले आहे. त्याने अलीकडेच त्याच्या सोशल मीडिया हँडल्सवर अनेक पोस्ट केल्या आहेत, पण जवळपास सर्वच पोस्ट आयपीएलबद्दल आहेत. आपने आयोजित केलेल्या आंदोलनात सहभागी होणार का? असे माध्यमांनी त्याला विचारले असता त्याने नाही असे उत्तर दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -