घरदेश-विदेशअहमदाबादमध्ये लिफ्ट कोसळून भीषण अपघात, 7 कामगारांचा मृत्यू

अहमदाबादमध्ये लिफ्ट कोसळून भीषण अपघात, 7 कामगारांचा मृत्यू

Subscribe

गुजरातच्या अहमदाबादमध्ये इमारतीची लिफ्ट कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. यात 7 कामगारांचा मृत्यू झाला असून 1 जखमी झाला आहे. बुधवारी सकाळी 9.30 वाजता गुजरात विद्यापीठाजवळील पासपोर्ट ऑफिस रोडवर एका बांधकामाधीन इमारतीची कोसळून ही दुर्घटना घडली आहे. ‘अॅस्पायर-2’ असे या बांधकामाधीन इमारतीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी इमारतीच्या नवव्या मजल्यावर बांधकाम सुरू होते. यावेशी कामगार लिफ्टमधून सामान वरच्या मजल्यावर नेते होते. मात्र लिफ्ट सातव्या मजल्यावर पोहोचताच अचानत तुटली, आणि खाली कोसळली, यावेळी लिफ्टमध्ये एकूण 8 मजूर होते. यातील सात कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर एक कामगार जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. यावेळी घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी कामगारांना लिफ्टमधून बाहेर काढले.

- Advertisement -

संजयभाई बाबूभाई नायक, जगदीशभाई रमेशभाई नायक, अश्विनभाई सोमाभाई नायक, मुकेश भरतभाई नायक, राजमल सुरेशभाई खराडी आणि पंकजभाई शंकरभाई खराडी अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मजुरांची नावे आहेत. दरम्यान जखमीची कामगाराची प्रकृतीही गंभीर आहे. जखमी कामगारावर सोला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सर्व मृत हे पंचमहाल जिल्ह्यातील घोघंबा येथील रहिवासी होते.


लागेल ते करावे, परंतु वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाऊ देऊ नका; अजित पवारांची मुख्यमंत्र्याकडे पत्रातून मागणी


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -