घरदेश-विदेशAndhra pradesh Bus accident : आंध्रप्रदेशच्या चित्तूरमध्ये भीषण बस अपघात; 7 ठार,...

Andhra pradesh Bus accident : आंध्रप्रदेशच्या चित्तूरमध्ये भीषण बस अपघात; 7 ठार, 45 जखमी

Subscribe

आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये शनिवारी रात्री बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघात 7 जणांचा मृत्यू असून 45 जण जखमी झाले आहेत. तिरूपतीपासून 25 किमी अंतरावर असलेल्या बाकरपेटा येथे हा अपघात झाला आहे. चालकाच्या निष्काळजीपणामुळे बस खडकावरून 100 फूट खोल दरीत कोसळ्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगितल जातेय. दरम्यान जखमींना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशी माहिती तिरुपतीच्या एसपींनी दिली आहे. या मृतांमध्ये महिला आणि अनेक मुलांचा समावेश आहे. अपघातग्रस्त बसमधील प्रवासी हे लग्न समारंभासाठी जात असल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

तिरूपतीपासून 25 किमी अंतरावर असलेल्या चंद्रगिरी मंडलमधील बारकोटा भागात शनिवारी रात्री हा भीषण अपघात झालाय. या बसमधून जवळपास 50 हून अधिक प्रवासी तिरुपतीला लग्न समारंभासाठी जात होते, परंतु चालकाचे वळन ओलांडताना नियंत्रण सुटले आणि बस खोल दरीत कोसळली. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती देत बचाव कार्य सुरु केले. दरम्यान पोलीस आणि प्रशासनाचे बचाव पथक देखील काही वेळाने घटनास्थळी दाखल झाले, मात्र रात्री अधिक अंधार असल्याने बचाव कार्य राबवण्यात अडचणी येत होत्या, त्यामुळे रविवारी पहाटे पुन्हा बचावकार्य सुरु करण्यात आले.

दरम्यान बचावकार्यातून आत्तापर्यंत 7 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. तर 45 जखमींना बाहेर काढत त्यांना तात्काळ उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर गंभीर जखमी रुग्णांना इतर रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -