घरदेश-विदेशजम्मू काश्मीरमध्ये अंसार गजवातुल हिंदच्या म्होरक्यासह ७ दहशतवादी ठार

जम्मू काश्मीरमध्ये अंसार गजवातुल हिंदच्या म्होरक्यासह ७ दहशतवादी ठार

Subscribe

चार भारतीय जवान जखमी

जम्मू- काश्मीरच्या शोपियान आणि पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चमकमकीमध्ये अंसार गजवातुल हिंद दहशतवादी संघटनेचा म्होरक्या इम्तियाज अहमद शाहासह सात दहशतवाद्यांना ठार करण्यात जम्मू काश्मीर सुरक्षा जवानांना यश आले आहे. याबाबतची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली आहे. तसेच एका पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, शोपियान जिल्ह्यात झालेल्या चकमकीत पाच दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले तर पुलवामा जिल्ह्यातील त्रल नौबाग भागात झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत.

- Advertisement -

काश्मीर झोन पोलिसांच्या माहितीनुसार, गुरुवारी शोपियाँ भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी एक मशिदीचा आसरा घेतला. या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दल प्रयत्न करत आहे. गुरुवारी सायंकाळपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. या भागात मोठ्या प्रमाणात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती त्यानंतर सुरक्षा दलाचे याठिकाणी सर्च ऑपरेशन सुरु आहे.

याबाबत पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटले की, शोपियाँ जन मोहल्ला भागातील मशिदीला वाचवण्याचे आणि दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण करावं, यासाठी सुरक्षा दलाकडून प्रयत्न सुरू आहेत. या दहशतवाद्यांनी बाहेर आणण्यासाठी मशिदीत एक स्थानिक इमाम आणि आत उपस्थित असलेल्या एका दहशतवाद्याच्या भावाला पाठवण्यात आलं आहे. हे ऑपरेशन अद्यापही सुरूआहे. दरम्यान शोपियाँ आणि पुलवामा भागात इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आलीय. दहशतवादी संघटना अन्सार गजवतुल हिंदच्या म्होरक्याला पकडण्यासाठी सुरक्षा दलाने घेराव घातला आहे. या चकमकीमध्ये आत्तापर्यंत सुरक्षा दलाचे चार जवान जखमी झाले आहेत.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -