घरदेश-विदेश'या' राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात ३०% वाढ, सेवानिवृत्तीचे वय वाढून ६१...

‘या’ राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात ३०% वाढ, सेवानिवृत्तीचे वय वाढून ६१ वर्षांवर!

Subscribe

१ एप्रिल २०२१ पासून लागू होणार आदेश

सरकारी कर्मचार्‍यांसाठी मोठी बातमी आहे. तेलंगणा सरकारने राज्य सरकारी कर्मचार्‍यांना मोठी भेट जाहीर केली आहे. त्याअंतर्गत तेलंगणा सरकारने राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या पगारामध्ये ३० टक्के फिटमेंट वाढविण्याची घोषणा केली आहे. तर राज्य सरकारनेही सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६१ वर्षांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी विधानसभेत ही घोषणा केली. माध्यमांनुसार, कंत्राटी कामगार आणि आउटसोर्सिंग कर्मचार्‍यांसह राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सुमारे ९.१७ लाख कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार आहे.

१ एप्रिल २०२१ पासून लागू होणार आदेश

मिळालेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०२१ पासून सर्व कर्मचार्‍यांच्या पगारात वाढ केली जाणार आहे. याशिवाय मुख्यमंत्र्यांनी सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६१ वर्षांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. के चंद्रशेखर राव म्हणाले की, राज्यातील सर्व कर्मचारी व शिक्षकांच्या पगारामध्ये ३० टक्के फिटमेंट वाढ जाहीर करताना आनंद होत आहे. यासह पुढे ते असेही म्हणाले की, हा आदेश १ एप्रिल २०२१ पासून लागू होणार आहे.

- Advertisement -

यासह अतिरिक्त १५ टक्के पेन्शन वाढविण्याच्या वयाची मर्यादा सध्याच्या ७५ वर्षांवरून कमी करुन ७० वर्षे केली जाणार आहे. सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना देण्यात आलेली जास्तीत जास्त ग्रॅच्युटी सध्याच्या १२ लाखांवरून १६ लाख रुपये करण्यात येणार आहे. के चंद्रशेखर राव यांनी केजीबीव्हीसाठी कार्यरत महिला कर्मचार्‍यांना १८० दिवसांची प्रसूती रजा वाढविण्याची घोषणा केली. दरम्यान, कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने राज्याच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम झाला असल्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव म्हणाले. २०१४ च्या सुरुवातीस राज्य सरकारने सरकारी कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये वाढ केली होती. त्यावेळी राज्य सरकारने कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये सुमारे ४३ टक्के वाढ केली होती.

- Advertisement -

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -