घरताज्या घडामोडीमागील पाच वर्षात 'या' राज्यात ७०० कोटींची वीजचोरी, नक्की काय आहे प्रकार?

मागील पाच वर्षात ‘या’ राज्यात ७०० कोटींची वीजचोरी, नक्की काय आहे प्रकार?

Subscribe

भारतात वीजचोरी ही एक मोठी समस्या आहे. एखाद्या मोठ्या सण-उत्सवाच्या वेळी अनेक वेळेस वीजचोरी केल्याची प्रकरणं उघडकीस आली आहेत. एक धक्कादायक प्रकार हरियाणातून समोर आला आहे. हरियाणात गेल्या पाच वर्षात ७०० कोटींची वीजचोरी उघडकीस आली आहे. यामध्ये सहभागी लोकांकडून ३७८.३३ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

दक्षिण हरियाणा वीज वितरण निगमचे व्यवस्थापकीय संचालक पीसी मीना यांनी चालू आर्थिक वर्षातील मागील महिन्यापर्यंत ५१.२१ कोटींची वीजचोरी आणि ३१.२२ कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच तांत्रिक हस्तक्षेप आणि पायरसी डिटेक्शनद्वारे हानी कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं व्यवस्थापकीय संचालकांकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

२०२१-२२ या आर्थिक वर्षात १५६.६५ कोटी रुपयांची वीजचोरी आढळून आल्यानंतर ७८.७० कोटींचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक पीसी मीना यांनी दिली आहे. तसेच या संदर्भात ४२,५०१ एफआयआर नोंदवण्यात आल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले आहे. वीजचोरी हा कायदेशीर गुन्हा असून ज्या ग्राहकांनी वीजचोरीचा थकीत दंड जमा केला नाही, त्यांच्याविरूद्ध कारवाई केली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.


हेही वाचा : ठाण्यातील लम्पीचा प्रसार रोखण्यासाठी जनावरं ने-आण करण्यास मनाई, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -