घरदेश-विदेश७१ हजार तरुणांना मिळाल्या सरकारी नोकऱ्या, पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्ती पत्रे सादर

७१ हजार तरुणांना मिळाल्या सरकारी नोकऱ्या, पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्ती पत्रे सादर

Subscribe

गेल्या महिन्याभरात महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये हजारो तरुणांना नियुक्ती पत्रे दिले आहेत. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश सरकारनेसुद्धी नियुक्ती पत्रे दिले. जम्मू काश्मीर, लडाख, अंदमान आणि निकोबार द्विप समूह, लक्षद्विप, दादरा आणि नगर हवेली, दीव, चंदीगढ येथे रोजगार मेळावा घेत अनेक युवकांना नोकऱ्या दिल्या आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

नवी दिल्ली – तरुणांना देशातील सर्वांत मोठी ताकद संबोधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० लाख रोजगार मेळाव्याअंतर्गत आज मंगळवारी ७१ हजार तरुणांना नियुक्ती पत्रे देण्यात आले आहेत. गेल्या महिन्याभरापासून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील अनेकांना नोकऱ्या देण्याचे अभियान सुरू आहे. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवादही साधला.

हेही वाचा – छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे दिल्लीत किती रस्ते आहेत? सुधांशू त्रिवेदी यांचा पुन्हा सवाल

- Advertisement -

डबल इंजिन सरकार असल्याने हे फायदे होत आहेत. तरुणांना नियुक्तीपत्रे देण्याचं काम यापुढेही सुरुच राहिल, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकींचा धुराळा उडाला आहे. या निवडणुकीत प्रचाराच भाजपा सरकारने डबल इंजिन सरकारला प्रचाराचा मुद्दा बनवला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, ७१ हजार ५६ तरुणांना आज नियुक्ती पत्रे दिले. मात्र, यामध्ये गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील तरुणांचा सहभाग नाही. कारण या दोन्ही राज्यात विधानसभा निवडणुकींसाठी आचारसंहिता लागू असल्याने केंद्र सरकार येथे ही योजना तात्पुरती राबवू शकत नाही.

- Advertisement -

गेल्या महिन्याभरात महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये हजारो तरुणांना नियुक्ती पत्रे दिले आहेत. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश सरकारनेसुद्धी नियुक्ती पत्रे दिले. जम्मू काश्मीर, लडाख, अंदमान आणि निकोबार द्विप समूह, लक्षद्विप, दादरा आणि नगर हवेली, दीव, चंदीगढ येथे रोजगार मेळावा घेत अनेक युवकांना नोकऱ्या दिल्या आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -