घरताज्या घडामोडीदेशात कोरोनाचे 7231 नवे रुग्ण, संसर्गाचा दर 2.05 टक्क्यांवर

देशात कोरोनाचे 7231 नवे रुग्ण, संसर्गाचा दर 2.05 टक्क्यांवर

Subscribe

भारतात कोरोना महामारीमुळे तब्बल दोन वर्षांनंतर लाडक्या बाप्पाच्या आगमनाची धामधुम सुरु आहे. अशातच कोरोनाबाबत एक दिलासाजनक बातमी समोर आली आहे. भारतात कोरोना रुग्णसंख्या काहीप्रमाणात आटोक्यात येत आहे. तर संसर्गाचा वेग बराच कमी झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने नवीन रुग्णांचा आकडा 10 हजारांच्या खाली पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 7,231 नवीन रुग्ण आढळून आले. ही रुग्णसंख्या एका दिवसापूर्वी 5,439 इतकी होती. भारतात मंगळवारी 5,439 नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. यासह कोरोनाचा संसर्ग दर 2.05 टक्के नोंदवला गेला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 10,828 लोक कोरोनापासून बरे झाले आहेत. आता देशभरात 64,667 सक्रिय प्रकरणे आहेत. त्याचवेळी मंगळवारपर्यंत 65,732 सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय, कोरोनामुळे एकूण मृत्यूंची संख्या 52,7874 वर पोहोचली आहे.

- Advertisement -

एका दिवसात 45 मृत्यू

देशात कोरोनामुळे एका दिवसात 45 नवीन मृत्यूची नोंद झाली आहे. त्यात केरळमधील 10 जुनी प्रकरणे आहेत. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, एकूण संसर्गाच्या 0.15 टक्के सक्रिय प्रकरणे आहेत, तर कोरोनाचा पुनर्प्राप्तीचा दर 98.67 टक्के झाला आहे. 24 तासांच्या कालावधीत सक्रिय कोरोना रुग्णांमध्ये 1,065 प्रकरणांची घट नोंदवली गेली आहे.

22 लाखांहून अधिक लोकांना मिळाली लस

केंद्रीय आकडेवारीनुसार, मंगळवारी 22,50,854 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली. यानंतर लसीकरणाची एकूण संख्या 2,12,39,92,816 वर पोहोचली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : शीतयुद्ध संपुष्टात आणणारे माजी सोव्हिएत राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे निधन


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -