Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशIllegal Indian Immigrants : अहमदाबाद विमानतळावर 33 गुजराती उतरले, आतापर्यंत 74 नागरीक हद्दपार

Illegal Indian Immigrants : अहमदाबाद विमानतळावर 33 गुजराती उतरले, आतापर्यंत 74 नागरीक हद्दपार

Subscribe

अमेरिकेतून हद्दपार केलेल्या 33 गुजराती नागरिकांना दोन विमानांमधून अमृतसरहून अहमदाबाद विमानतळावर पाठवण्यात आले.

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बेकायदेशीर स्थलांतरावरील कारवाईचा भाग म्हणून सर्व बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना मायदेशी परत पाठवले जात आहे. काही दिवसांपूर्वी 104 अवैध भारतीयांना मायदेशी पाठवण्यात आले होते. यानंतर 15 फेब्रुवारी रोजी 116 आणि 16 फेब्रुवारी रोजी 119 अवैध भारतीयांना घेऊन येणार अमेरिकन लष्करी विमान अमृतसर विमानतळावर उतरले. या दोन तुकड्यांमधून अमेरिकेतून हद्दपार केलेल्या 33 गुजराती नागरिकांना दोन विमानांमधून अमृतसरहून अहमदाबाद विमानतळावर पाठवण्यात आले. (74 illegal Gujarati citizens deported from US so far)

6 फेब्रुवारीपासून गुजरातमधील 74 नागरिकांना अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले आहे. यापैकी 33 जण आज अहमदाबाद विमानतळावर पोहोचले. विमानतळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक एस.जी. खांभळा म्हणाले की, दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास तीन स्थलांतरित आले. त्यापैकी दोघे मेहसाणा आणि एक गांधीनगर जिल्ह्यातील होते. यानंतर दुपारी 2 च्या सुमारास आणखी 30 जण दुसऱ्या विमानातून आले. या सर्व नागरिकांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी विमानतळावर पोलिसांच्या गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती.

हेही वाचा – Bangladesh : आधी शेख हसीनांचे सरकार पाडले, आता त्यांनीच मोहम्मद युनूस यांना दिला अल्टिमेटम

याआधी 41 गुजराती नागरिकांना घरी पाठवले

6 फेब्रुवारी रोजी अहमदाबाद विमानतळावर उतरलेल्या 104 भारतीयांमध्ये 33 गुजराती नागरिकांचा समावेश होता. या नागरिकांना मेहसाणा, गांधीनगर, पाटण आणि अहमदाबाद जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात आले. यानंतर 15 फेब्रुवारी रोजी आलेल्या दुसऱ्या तुकडीमधील 116 नागरिकांमध्ये 8 गुजराती नागरिकांचा समावेश होता. या सर्वांना पोलिसांच्या वाहनांमधून त्यांच्या घरी पाठवण्यात आले.

महिला आणि मुलांच्या हातातून बेड्या नाहीशा

अमेरिकेमधून हद्दपार करण्यात आलेल्या पहिल्या तुकडीमधील भारतीयांना हातात बेड्या आणि पायात साखळदंड घालून पाठवण्यात आले होते. अमेरिकेने दाखवलेल्या या वागणुकीवर चांगलीच टीका करण्यात आली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच अमेरिकेचा दौरा केला. या दौऱ्यावेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या भेटीमध्ये अवैध भारतीयांच्या हद्दपारीच्या मुद्द्यावर चर्चा केली. यानंतर 15 फेब्रुावरी रोजी रात्री उशीरा पंजाबमधील अमृतसर येथे आलेल्या दुसऱ्या तुकडीतील अवैध भारतीयांपैकी महिला आणि मुलांना उड्डाणादरम्यान बेड्या घालण्यात आल्या नव्हत्या, अशी माहिती समोर येत आहे. मात्र प्रवासादरम्यान पुरुषांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या.

हेही वाचा – Supreme Court : उत्तर प्रदेश सरकारवर सुप्रीम कोर्ट संतापले, पाठवली नोटीस; कारण काय?