घरदेश-विदेश74th Independence Day Live : पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण

74th Independence Day Live : पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण

Subscribe

पॉन्डेचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांच्या हस्ते इंदिरा गांधी स्टेडिअम येथे ध्वजारोहण करण्यात आले.

- Advertisement -

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या हस्ते साहिबझादा अजित सिंह नगर येथे ध्वजारोहण केले.

- Advertisement -

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधान सभा परिसरात ध्वजारोहण केले.


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी ध्वजारोहण करण्यात आले. नुकतेच त्यांनी कोरोनासारख्या आजाराशी लढा दिला आहे.


दिल्लीत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.


छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी रायपूर येथे ध्वजारोहण केले.



राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी महाराष्ट्रातील नागपूर येथील त्यांच्या मुख्यालयात ध्वजारोहण केले.


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावरील निवासस्थानी ध्वजारोहण केले.


कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी बंगळुरू येथील माणकेश्वर परेड मैदानावर ध्वजारोहण केले.


भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात ध्वजारोहण केले.


मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भोपाळ येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात ध्वजारोहण केले.


उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी आपल्या निवासस्थानी ध्वजारोहण केले.


ध्वजारोहणानंतर लाल किल्ल्याहून जाताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना हात दाखवून अभिवदान केले.


भारतातील १३० कोटी लोकांमध्ये देशाला आत्मनिर्भर बनवण्याची क्षमता आहे.


कोरोनाच्या या संकटकाळात ‘सेवा परमो धर्मा’ची भावना आपल्यासोबत आहे. आपल्या आयुष्याची पर्वा न करता डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, अॅम्बुलन्स कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस, संरक्षण व्यवस्था, अनेक लोक २४ तास काम करत आहेत.


७४ व्या स्वातंत्र्य दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला काय संबोधित करणार याकडे सर्वांचे लक्ष.


पंतप्रधान नरेंद्र मोदी ७४ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशाला संबोधित करत आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण संपन्न. देशाचा झेंडा फडकताच राष्ट्रगीताला सुरूवात.


पंतप्रधान नरेंद्र मोदींना लष्कर, वायू, नौदलाकडून गार्ड ऑफ ऑनर


पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर दाखल. थोड्याच वेळात होणार ध्वजारोहण


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन केले.


लाल किल्ल्यावर ध्वजारोहणासाठी मान्यवर दाखल. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभा विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आणि लष्करप्रमुख बिपीन रावत आदी मान्यवर उपस्थित


भारताचा आज, १५ ऑगस्ट रोजी ७४ वा स्वातंत्र्य दिन असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्ली लाल किल्ल्यावर ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. कोरोनाच्या संकटकाळात मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करतील. तर पंतप्रधानांनी ट्विटरच्या माध्यमातून देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -