घरदेश-विदेश78 टक्के कर्मचाऱ्यांना ऑफिसला जाणे पसंत; एका सर्व्हेचा निष्कर्ष

78 टक्के कर्मचाऱ्यांना ऑफिसला जाणे पसंत; एका सर्व्हेचा निष्कर्ष

Subscribe

नवी दिल्ली : कोरोनाच्या महामारीच्या काळात अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम-होम (work from home) कल्चर सुरू केले होते, जे काही ठिकाणी चालू आहे तर काही ठिकाणी बंद झाले आहे. सध्या कोविडचा प्रभाव कमी झाल्यामुळे अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलावण्यास सुरुवात केली आहे. कारण कर्मचाऱ्यांना आता ऑफीसमध्ये जाताना कोणतीही गैरसोय होत नाही. बऱ्याच दिवसांनी ऑफीसमध्ये कर्मचारी येत असल्यामुळे वातावरणही बदलू लागले आहे. पूर्वी लोक ऑफिसला जाणाऱ्या लोकांमध्ये कंटाळा दिसून यायचा, मात्र आता कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह दिसून येतो आहे.

28 फेब्रुवारी ते 6 मार्च 2023 दरम्यान लिंक्डइनद्वारे आयोजित करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये भारतातील 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 1,001 कर्मचाऱ्यांवर सेन्सस इंडियाने केलेल्या संशोधनावर आधारित हा अहवाल देण्यात आला होता. या अहवालात असे दिसून आले आहे की, 78 टक्के म्हणजे 100 पैकी जवळपास 80 भारतीय कर्मचारी त्यांच्या सहकाऱ्यांशी असलेला नातेसंबंध, मैत्री आणि संपर्क साधण्यासाठी ऑफीसमध्ये जाणे पसंत करतात. त्याचवेळी अहवालात असे दिसून आले की, 63 टक्के कर्मचाऱ्यांना वाटते की, ऑफीसपासून दूर राहिल्यामुळे करिअरवर कोणताही परिणाम होत नसला तरी त्यांची करिअर वाढीची क्षमता नक्कीच कमी होऊ शकते.

- Advertisement -

78 टक्के कर्मचारी स्व-मर्जीने ऑफीसला जातात
अहवालानुसार पूर्वीच्या कर्मचार्‍यांना ऑफीसमध्ये शारीरिकरित्या उपस्थित राहण्याची सक्ती वाटत होती, परंतु आता 78 टक्के कर्मचाऱ्यांनी स्वत: च्या इच्छेने शारीरिकरित्या ऑफीसमध्ये उपस्थित राहावे असे वाटते. विशेष म्हणजे कर्मचारी इतर कर्मचाऱ्यांसोबत वेळ घालवण्यासाठी ऑफीसला येण्यास प्राधान्य देतात. 72 टक्क्यांहून अधिक कर्मचारी कामाच्या ठिकाणी असलेला छोटासा टी-ब्रेकसुद्धा खूप मिस करतात. त्यांना त्यांचे काम आणि वैयक्तिक जीवन इतर सहकाऱ्यांसोबत शेअरिंग करण्यासोबतच थोड्या-फार गप्पा मारयच्या असतात.

सहकाऱ्यांच्या डेस्कवर वेळ घालवण्याचा नवा ट्रेंड
कोरोनानंतर ऑफिसमध्ये नवीन ट्रेंड येऊ लागला आहे. याला आपण डेस्क बॉम्बिंग असेही म्हणू शकतो. अहवालानुसार बहुतेक कर्मचारी त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांच्या डेस्कवर अधिक वेळ घालवणे पसंत करतात. बहुतेक कर्मचाऱ्यांना आपल्या इतर सहकाऱ्यांसोबत कल्पना न देता त्यांच्या डेस्कवर जाऊन गप्पा मारायला आवडतात. या सर्वेक्षणातील 62 टक्के लोकांना असे वाटते की इतर सहकाऱ्यांसोबत लगेच बोलण्यासाठी किंवा त्यांच्यासोबत गप्पा मारण्यासाठी डेस्क बॉम्बिंग हा सर्वोत्तम मार्ग आहे.

- Advertisement -

कर्मचाऱ्यांना शुक्रवारी ऑफीसला जाणे आवडत नाही
यापूर्वी कर्मचाऱ्यांना शुक्रवारी ऑफिसला जाणे खूप आवडायचे. कारण शुक्रवारनंतर 2 दिवसांच्या सुट्टीसाठी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह दिसून यायचा. मात्र आता गुरुवार हाच नवा शुक्रवार बनत आहे. सर्व्हेनुसार आता लोक वर्क लाईफ बॅलन्स तयार करण्यासाठी जागरूक होत आहेत.
आता कर्मचाऱ्यांना शुक्रवारी ऑफीसला जायला आवडत नाही. त्यामुळे सामान्य दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी कमी कर्मचारी कार्यालयात दिसतात. सर्वेक्षण करण्यात आलेल्या 50 टक्के लोकांनी सांगितले की, त्यांना शुक्रवारी कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवायला आवडते. याशिवाय काही कर्मचाऱ्यांना या दिवशी आपली उर्वरित कामे मार्गी लावायची असतात. त्यामुळेच कर्मचाऱ्यांना शुक्रवारी ऑफिसला जायला आवडत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -