Tuesday, August 3, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश महागाई भत्त्यानंतर मोदी सरकारकडून आणखी एक खुशखबर! ऑगस्टपासून वाढणार पगार

महागाई भत्त्यानंतर मोदी सरकारकडून आणखी एक खुशखबर! ऑगस्टपासून वाढणार पगार

Related Story

- Advertisement -

केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता (Dearness allowance, DA) वाढीसह केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक खुशखबर समोर येत आहे. त्यांचा महागाई भत्ता वाढवल्यानंतर सरकारने घरभाडे भत्ता House Rent Allowance (HRA) मध्येही बदल करण्यात आला आहे. यासह ऑगस्ट महिन्याच्या पगारामध्ये एचआरएचीही वाढ केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. सरकारच्या आदेशानुसार एचआरए वाढविण्यात येणार असून डीएने २५ टक्केचा टप्पा पार केला आहे. आता केंद्रीय कर्मचार्‍यांना त्यांच्या शहरानुसार २७ टक्के, १८ टक्के आणि ९ टक्के घरभाडे भत्ता मिळणार असल्याचे अर्थ मंत्रालयाच्या आदेशानुसार सांगितले जात आहे. हे वर्गीकरण एक्स, वाय आणि झेड वर्ग शहरांनुसार आहे. म्हणजेच एक्स क्लास सिटीमध्ये राहणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्याला आता अधिक एचआरए मिळणार आहे. यानंतर वाय वर्ग आणि त्यानंतर झेड वर्गाला देखील हा भत्ता देण्यात येणार आहे.

सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर केंद्र सरकारने एचआरएची पद्धत बदलली होती. यात एक्स, वाय व झेडच्या तीन श्रेणी तयार केल्या होत्या. त्यानुसार २४ टक्के, १८ टक्के आणि ९ टक्के एचआरए घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. असेही सांगितले जाते की, जेव्हा डीए २५ टक्के पार करेल तेव्हा त्यामध्ये सुधारणा करण्यात येईल. अलाहाबाद एजी ऑफिस ब्रदरहुडचे माजी अध्यक्ष आणि अखिल भारतीय ऑडिट अँड अकाउंट्स असोसिएशनचे सहायक सरचिटणीस हरीशंकर तिवारी यांच्या मते, एक्स श्रेणी अव्वल असून यामध्ये ५० लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचा समावेश आहे. येथे कार्यरत केंद्रीय कर्मचार्‍यांना आता २७ टक्के एचआरए मिळणार आहेत. त्याचबरोबर वाय श्रेणी शहरांमध्ये एचआरए १८ टक्के असणार तर झेड श्रेणीत एचआरए ९ टक्के असणार आहे.

- Advertisement -

यासह शहराचे अपग्रेडेशन देखील एचआरए अंतर्गत केले जाते. जसे की जर एखाद्या शहराची लोकसंख्या ५ लाखांची लोकसंख्या पार केली असेल तर ती झेड श्रेणीतून वाय श्रेणीमध्ये श्रेणीसुधारित होते. म्हणजेच ९ टक्क्यांऐवजी १८ टक्के एचआरए तेथे मिळणार असल्याचे हरीशंकर तिवारी यांनी सांगितले.


- Advertisement -