नवी दिल्ली : तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे. योग्य त्या प्रक्रियेनंतर हा महागाई भत्ता लागू करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मागील काही दिवसांपासून केंद्रीय कर्मचारी संघटनांकडून वाढीव महागाई भत्याची मागणी केली जात होती. यावर विचारमंथन करणाऱ्या केंद्र सरकारकडून काही अंशी सकारात्मक निर्णय घेण्याचा विचार केंद्राने केला आहे. केंद्र सरकार महागाई भत्त्यात तीन टक्के एवढी वाढ करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे सध्याच्या 42 टक्के महागाई भत्त्यात वाढ होऊन तो 45 टक्के एवढा होणार आहे. त्यासाठी मात्र, अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाचा आधार घेतल्या जाणार आहे.
मंजुरीसाठी प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळासमोर जाणार
सध्या केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करण्याच्या तयारीत असताना कर्मचारी संघटनांकडून तोच महागाई भत्ता 4 टक्के करावा अशी मागणी करीत आहेत. मात्र, केंद्रीय अर्थ मंत्रालयातील कार्मिक खर्च विभाग त्यासाठईचा प्रस्ताव तयार करणार असून, हा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रीमंडळासमोर जाणार आहे. तेथे या प्रस्तावाला मंजुरी मिळते की, नाही हे पहावे लागणार आहे.
हेही वाचा : Parliament Session: मोदी सरकारची उद्या परीक्षा; अमित शहा राज्यसभेत सादर करणार दिल्ली सेवा विधेयक
मंजुरी मिळाल्यास जुलैपासून होणार लागू
केंद्रीय मंत्री मंडळासमोर ठेवण्यात येणाऱ्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास महागाई भत्त्यामधील वाढ ही 1 जुलैपासून लागू होणार आहे. सध्या कर्मचाऱ्यांना 42 टक्के महागाई भत्ता मिळत आहे. त्यामध्ये वाढ होणार आहे. मागील वाढ ही 24 मार्च 2023 पासून लागू करण्यात आली होती. ती 1 जानेवारीपासून लागू करण्यात आली होती.
हेही वाचा : अमित शहांसोबत जयंत पाटलांची कुठलीही भेट नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हे मिळणार लाभ
महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंर केंद्रीय कर्मचाऱअयांना हाऊस रेंट अलाऊंन्समध्ये वाढ होऊ शकते. घरभाडे सवलतीत तीन टक्के वाढ अपेक्षित आहे. त्यामुळए 50 लाखापेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. सोबतच केंद्रीय कर्मचारी फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याची मागणी करत आहेत. केंद्र सरकार त्यांच्या मागणीवर विचार करू शकतात. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 2.57 टक्क्यांच्या हिशोबाने फिटमेंट फॅक्टरचा लाभ मिळाला. कर्मचारी हा भत्ता 3.68 टक्के करण्याची मागणी करत आहे. असे झाले तर कर्मचाऱ्यांचा मुळ पगार 18,000 रुपयांहून 26,000 रुपये होणार आहे.