Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश 2022 मध्ये महागाई भत्त्यात वाढीची घोषणा होणार: 20 हजार बेसिकवर किती फायदा?...

2022 मध्ये महागाई भत्त्यात वाढीची घोषणा होणार: 20 हजार बेसिकवर किती फायदा? जाणून घ्या

Subscribe

नवीन वर्ष 2022 या वर्षाची सुरुवात होताच महागाई भत्ता वाढीच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. कारण याचा थेट फायदा हा देशातील कोट्यावधी केंद्रीय आणि राज्य सेवा कर्मचाऱ्यांना होणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ मिळणार आहे. महागाई भत्त्यात ही वाढ जुलै ते डिसेंबर 2021 साठीची असेल. त्यामुळे वेतन वाढीची ही बातमी अनेकांना आनंद देणारी आहे.

कामगार मंत्रालयाने नोव्हेंबर 2021 साठी इंडिया कंज्यूमर प्राईस इंडेक्स (AICPI-IW) चा डेटा जारी केला आहे. यामध्ये आधीच्या आकडेवारीच्या तुलनेत 0.8 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. नोव्हेंबरमध्ये AICPI-IW हा 125.7 वर आला आहे. तर ऑक्टोबर 2021 मध्ये तो 124.9 वर होता. दरम्यान ही आकडेवारी सोडून आपल्या महागाई भत्त्यावर याचा किती परिणाम होईल जाणून घेऊ,

- Advertisement -

डीए एक्सपर्टच्या मते, ऑक्टोबरच्या तुलनेत निर्देशांकात वाढ झालीय. यात नोव्हेंबरमध्ये All India CPI-IW मध्ये चांगली वाढली झाली, सध्याच्या आकडेवारीनसार, जानेवारीमध्ये डीएमध्ये ३ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. यात All India CPI-IW मध्ये नोव्हेंबरमध्ये घसरला असता तर डीए ३ टक्क्यांनी वाढला नसता. सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए सध्या 28 टक्के आहे. या डीएमध्ये शेवटची वाढ जुलै 2021 मध्ये झाली होती.

3 टक्के वाढीवर DA चे कॅल्क्युलेशन

जर मूळ वेतन 20,000 रुपये असेल.

- Advertisement -

यामध्ये 31 टक्के DA जोडला जाईल – 6200 रुपये

HRA – 5400 रुपये (न्‍यूनतम)

प्रवास भत्ता वगळता 1 महिन्यात एकूण पगार 31600 रुपये असेल.

AICPI डेटा

महिना  CPI-01 CPI-16

जुलै 2021 353.66 122.8

ऑगस्ट 2021 354.24 123.0

सप्टेंबर 2021 359. 71 124.9

ऑक्टोबर 2021 359.71 124.9

नोव्हेंबर 2021 ….. 125.7

कसा घेण्यात आला डेटा

कामगार मंत्रालय देशातील 88 औद्योगिक केंद्रांमधील 317 बाजारांमधून किरकोळ किमती काढते. या आधारावर दर महिन्याला औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक तयार केला जातो.


Heavy snowfall : काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी; महामार्ग बंद तर वैष्णोदेवी मंदिर दर्शन सेवेत अडथळे


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -