घरताज्या घडामोडीसरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्क्यांची वाढ, सरकारची मोठी घोषणा

सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्क्यांची वाढ, सरकारची मोठी घोषणा

Subscribe

सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. त्रिपुरातील राज्य सरकारने महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून त्यामध्ये ५ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली आहे.

महागाई भत्त्यात वाढ

- Advertisement -

विशेष म्हणजे अनेक राज्य सरकारांनी महागाई भत्त्यात वाढ केली आहे. आता त्रिपुरा सरकारने महागाई भत्त्यात वाढ करून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. हा वाढलेला महागाई भत्ता १ जुलै २०२२ पासून लागू झाला आहे. राज्यमंत्री सुशांत चौधरी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

त्रिपुरामध्ये निवडणुका होणार

- Advertisement -

त्रिपुरामध्ये पुढील वर्षी मार्चपर्यंत विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत सरकारी कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर ५२३.८० कोटी रुपयांचा बोजा वाढणार आहे. तसेच १,०४,६८३ कर्मचार्‍यांव्यतिरिक्त ८०,८५५ पेन्शनधारकांना सरकारच्या या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच त्रिपुरातील एकूण १,८८,४९४ लोकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

यापूर्वी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३१ टक्क्यांवरून ३४ टक्के केला आहे. याचा फायदा मध्यप्रदेशातील ७.५ लाख कर्मचाऱ्यांना होणार असला तरी राज्याच्या तिजोरीवर ६२५ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए वाढणार

दरम्यान, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ताही ३४ टक्क्यांवरून ३८ ते ३९ टक्क्यांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. महागाई भत्त्यात वाढ करण्याबाबत मोदी सरकार लवकरच निर्णय घेऊ शकते.


हेही वाचा : मराठी माणूस पेटून उठल्यावर उच्चपदावर बसलेल्या व्यक्तीलादेखील भूमिका बदलावी लागते – महेश तपासे


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -