घरदेश-विदेश2021-22 वर्षात GDP मध्ये 8.7 टक्के वाढ

2021-22 वर्षात GDP मध्ये 8.7 टक्के वाढ

Subscribe

2021-22 आर्थिक वर्षात देशाचा GDP 8.7 टक्के दराने वाढला आहे. मंगळवारी सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. चौथ्या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादनाचा (GDP) वाढीचा दर 4.1 टक्के राहिला आहे. चौथ्या तिमाहीचा विकास दर चारही तिमाहींमध्ये सर्वात कमी राहिला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विटद्वारे सरकारचा हवाला देत ही माहिती दिली आहे.

2021-22 या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीतील आकडेवारी सर्वात कमी आहे. याचे कारण कोरोना आणि जागतिक कारणे असल्याचे मानले जात आहे. पहिल्या तिमाहीत विकास दर 20.1 टक्के, दुसऱ्या तिमाहीत 8.4 टक्के आणि तिसऱ्या तिमाहीत 5.4 टक्के होता. त्या तुलनेत चौथ्या तिमाहीत विकास दर 4.1 टक्क्यांवर आला आहे.

- Advertisement -

ओमिक्रॉनमुळे वस्तूंच्या किमती वाढल्या –

रशिया युक्रेन युद्धामुळे आणि ओमिक्रॉनमुळे वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. तर विकास दर कमी झाला आहे. NSO ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, चौथ्या तिमाहीत उत्पादन क्षेत्राची वाढ – 0.2 टक्के होती. त्याच वेळी, गेल्या वर्षी याच कालावधीत हा वेग 6.9 टक्के होता. कृषी क्षेत्राचा विकास दर 4.1 टक्के राहिला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत 3.1 टक्के होता. बांधकाम क्षेत्राचा विकास दर मागील वर्षीच्या याच तिमाहीत 14.5 टक्क्यांच्या तुलनेत 2 टक्के आहे.

- Advertisement -

व्यापार, हॉटेल, वाहतूक, दळणवळण क्षेत्रात वाढ –

व्यापार, हॉटेल, वाहतूक, दळणवळण आणि प्रसारणाशी संबंधित सेवांच्या स्थितीत सुधारणा झाली आहे. या क्षेत्रांमध्ये 5.3 टक्के वाढ झाली आहे, जी गेल्या वर्षी याच तिमाहीत 2.5 टक्के होती. त्याचप्रमाणे आर्थिक, रिअल इस्टेट आणि व्यावसायिक सेवांमध्ये 4.5 टक्के वाढ झाली आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -