pm modi speech today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाईव्हमधील ८ महत्त्वाचे मुद्दे

PM Modi

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील परिस्थिती भयावह झाली आहे. त्यामुळे आज मंगळवारी देशातील जनतेशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईव्ह आले. यावेळी त्यांनी सुरुवातीला कोरोनामुळे जीव गमावलेल्या सर्वांनी श्रद्धांजली वाहली. नंतर मोदी म्हणाले की, देशात कोरोनाची दुसरी लाट तुफानासारखी आली आहे. देशासमोर आणखीन एक संकट उभारले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात उचलेल्या पावलांना मजबूत करू.

मोदींच्या लाईव्हमधील महत्त्वाचे ‘आठ’ मुद्दे

ऑक्सिजनची मागणी वाढली

देशात सध्या ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली आहे. ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. ऑक्सिजन रेल्वेने आणावे लागत असो किंवा ऑक्सिजन निर्मित असो, सर्व काम जोरदार सुरू आहे.

मोठ्या फार्मा इंडस्ट्रीचा देशाला होणार फायदा

फार्मा क्षेत्रात औषधांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले असून मोठ्या पटीने औषध निर्मिती केली जात आहे. यासाठी औषध कंपन्यांना पूर्ण सहकार्य केले जात आहे. देशात प्रचंड मोठी फार्मा इंडस्ट्री असल्यामुळे त्याचा देशाला फायदा होणार आहे.

जगातील सर्वात स्वस्त लस भारतात

कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये भारताने पहिली लस तयार केली. जगातील सर्वात स्वस्त भारतात आहे. आतापर्यंत देशांमध्ये १२ कोटी जणांचा लसीकरण पार पडले आहे. दोन स्वदेशी लसींमुळेच जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात सुरू आहे.

कोरोना योद्धापासून ते बहुतांश जेष्ठांपर्यंत लसीकरण पूर्ण झाले आहे. आता १ मेपासून सुरू होणाऱ्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात १८ वर्षानंतरच्या कोणत्याही व्यक्तीला लस मिळणार आहे. आता भारतात लस तयार होईल, त्याचा अर्धा हिस्सा राज्य आणि हॉस्पिटलला मिळेल.

श्रमिकांना लस दिली जाणार

अर्थचक्र आणि उद्योग विश्व सुरू राहिलं यांची काळजी घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. श्रमिकांना तातडीने कोरोना लस मिळेल अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे श्रमिकांनी जिथे आहात, तिथेच थांबा, स्थलांतरीत होवू नका. त्याठिकाणीच लस मिळेल आणि कामही बंद होणार नाही. याआधीची परिस्थिती आतापेक्षा वेगळी आहे.

आणखीन सुविधा वाढवणार

आपल्याकडे आता टेस्टिंग आहे, उपचार आहे आणि कोविड सेंटर्सही आहेत. कोरोना परिस्थितीला लढण्यासाठी इन्फ्रा नव्हते, माहिती नव्हती. तरीही कमी वेळात या गोष्टीत सुधारणा केली आहे. आज आपल्या डॉक्टर कोरोनासंदर्भातील उपचाराच्या कौशल्यामुळे जास्तीत जास्त जीवन वाचवत आहेत. तसेच आता आपल्याकडे पीपीई कीट, लॅबचे नेटवर्क टेस्टिंगच्या सुविधा आपण वाढवत आहोत

तरुणांनी स्वतःच्या परिसरात करा कोरोना नियमांबाबत जागृती

तरुणांनी आपल्या परिसरात कोरोना नियमांबाबत जागृती करावी. स्वच्छता अभियानात लहान मुलांनी घरातल्या लोकांना धडे दिले होते, त्याचप्रमाणे आताही करायचे आहे. बालमित्रांनी आपल्या घरातल्या लोकांना कोरोनाचे गांभीर्य पटवून द्यायचे आहे.

प्रसारमाध्यांना केली विनंती

घरात असा माहोल तयार करा, विनाकारण, घरातील लोकं बाहेर पडू नयेत. प्रसारमाध्यमांनी लोकांना सतर्क आणि जागरूक करण्यासाठीचे प्रयत्न वाढवावे. भीतीचा माहोल कमी होईल, लोकं अफवा आणि भ्रमात कमी येतील.

लॉकडाऊनबाबत मोदींनी सर्व राज्यांना दिला हा सल्ला

सध्याच्या परिस्थिती देशाला लॉकडाऊन वाचवायचे आहे. राज्यांनी लॉकडाऊन हा अंतिम पर्याय ठेवावा. आपण अर्थव्यवस्थेसोबतच देशातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊया.